- पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील
- तासगाव मध्ये भाजपा कार्यालयाचे उद्घाटन
- काहींना पक्षात पुन्हा संधी मिळते का याची चिंता
- संजय पाटील यांना टोला
तासगाव / प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी रात्रंदिवस निस्वार्थीपणे झटत आहेत. भाजप हा व्यक्ती केंद्रित पक्ष नाही. तो कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. मात्र काही जणांना मला पुन्हा पक्षात संधी मिळते का. मला जिल्हा परिषद, पंचायत समिती मिळते का, याची चिंता लागली आहे, असा टोला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माजी खासदार संजय पाटील यांचे नाव न घेता लगावला.
तासगाव शहर आणि ग्रामीण अशा दोन भाजप कार्यालयांचे उद्घाटन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, मकरंद देशपांडे, वैभव पाटील यांच्यासह जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले, तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघाचे राजकारण केवळ दोन व्यक्तींभोवती फिरत आहे. या व्यक्तींनी मतदारसंघाचा कितपत विकास केला, यावर न बोललेलंच बरं. ते म्हणाले, म्हणाले, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर विकास सुरू आहे. सुमारे २५ कोटी लोकांना दारिद्र्यरेषेच्या वर आणण्यात मोदी सरकार यशस्वी ठरले आहे. देश आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करत आहे आणि २०४७ पर्यंत भारताला आर्थिक महासत्ता बनवण्याचे उद्दिष्ट मोदींनी ठेवले आहे. ते रात्रंदिवस देशाची सेवा करत आहेत.
यावेळी पालकमंत्री पाटील यांनी आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजप ताकदीने लढणार असल्याचे सांगितले. तसेच मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी कमी पडणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. या वेळी तासगाव ग्रामीण तालुकाध्यक्ष स्वप्नील पाटील, कवठेमहांकाळचे तालुकाध्यक्ष उदय भोसले, तासगाव शहराध्यक्ष स्वाती सूर्यवंशी, गोविंद सूर्यवंशी, विशाल भोसले, अभय माने, ऍड. सुखदेव कोरटे, पंकज पाटील, गजानन चौगुले, राजू लिंबळे, किरण जाधव, शिवाजी गुळवे, अक्षय सूर्यवंशी, अजय सूर्यवंशी, अक्षय यादव, सुशांत माने, अनिल माने, सूर्यकांत पवार, सारंग पवार, नामदेव पाटील, महेश पाटील, पुष्कर कालगावकर, विक्रांतसिंह पाटील यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
