तासगाव तालुक्यतील पाच जणांना खावी लागली तुरुंगाची हवा
तासगाव / प्रतिनिधी
तासगाव तालुक्यातील पाच शेती औषध दुकानदारा सह वीस जणाना बारबाला ची छमछम चांगलीच भोवली.त्यांच्या विरोधात पाचगणी पोलिसात गुन्हा दाखल झाल्याने त्या वीस जणांना तुरुंगाची हवा खावी लागली. यात तासगाव, जत सोलापूर ,पुणे , नाशिक येथील शेती औषध दुकानदाराचा समावेश आहे .प्रत्यक्ष औषध दुकानदाराचा सहभाग आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
पाचगणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्यात सागर प्रभाकर जाधव ( वय ३६ रा, मणेराजुरी ), हृषीकेश संभाजी औताडे ( वय २६ रा, तासगाव ), संतोष सुनील पाटील वय २८ रा, तासगाव ), महेश मोहन पाटील वय ४० रा, चिंचणी ), हणमंत रंगराव गायकवाड वय ३९ रा, चिंचणी ) याच्या सह जत, सोलापूर नाशिक व पुणे येथील अन्य १५ अशा वीस जणांचा समावेश असून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.मात्र ही सर्व पार्टी। आयोजित करणारा पोलिसांचा छापा पडताच पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. पण तो कोण आहे याची माहिती पोलिसांना लागली आहे.
पार्टी आयोजक कोण ?ही पार्टी आयोजित करण्यात कवठेएकद येथील एकाचा सहभाग असल्याची चर्च्या सुरू आहे. हा छापा पडला त्यावेळी त्या हॉटेल वर तो उपस्थित होता.मात्र तो संधी साधून हॉटेल मधून पळून गेला असल्याचे समजते.मात्र त्याने सोबत आणलेले साहित्य पोलिसांच्या हाती लागले असल्याने पोलीस लवकरच त्याच्या पर्यत पोहचतील असे समजते. या घटनेने बारबाला संस्कृती पुन्हा उघडकिस आली आहे. घटनेची मात्र तालुक्यात खुमासदार चर्च्या सुरू आहे.
या बाबत ची अधिक माहिती अशी : पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भिलार येथील हिराबाग हॉटेल वर एका औषध कंपनीच्या सल्लागाराने सांगली, सोलापूर , नाशिक , पुणे भागातील शेती औषध दुकानदाराच्या साठी बारबाला यांच्या साग्रसंगीताची मेजवानी आयोजित केली होती.पार्टी आणी साग्र संगीताचा कार्यक्रम सुरू असल्याची माहिती पाचगणी पोलिसांना मिळाली.पोलिसांनी या हॉटेल वर छापा टाकला असता या ठिकाणी असणाऱ्या बारबाला उत्तान होऊन तोडक्या कपड्यात बीभत्स नृत्य करीत असताना आढळून आल्या.
या वेळी १२ बारबाला पोलिसांना आढळून आल्या.तर वीस गिऱ्हाईक सापडली.पोलिसांनी साउंड सिस्टीम , मोबाईल ,महागडी कार या सह २५ लाखाहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.छाप्यात शेती औषध दुकानदार सापडल्याने तालुक्यात चांगलीच खळबळ माजली आहे. शेतकऱ्याच्या माथ्यावर बनावट औषधे विकून बारबाला वर पैसे उडविणार्या दुकानदाराची मात्र चांगलीच उलट सुलट चर्च्या तालुक्यात सुरू आहे.
