yuva MAharashtra स्वराज्य फाउंडेशनच्या शिरपेचात सुवर्णपदकाचा तुरा

स्वराज्य फाउंडेशनच्या शिरपेचात सुवर्णपदकाचा तुरा

सांगली टाईम्स
By -

 

सुवर्णपदक विजेत्या समरजित शिंदे यांचे अभिनंदन करताना आमदार रोहित पाटील.

◼️ समरजित शिंदेचे तीनशे मिटर धावणे स्पर्धेत यश 

तासगांव / प्रतिनिधी

पंढरपूर येथे झालेला राज्यस्तरीय सब ज्युनिअर वैयक्तिक मैदानी स्पर्धेत बारा वर्षाखालील मुले गटात फाउंडेशन चा खेळाडू समरजीत प्रशांत शिंदे याने तीनशे मीटर धावणे या खेळ प्रकारात सुवर्णपदक पटकावले. त्याच्या या यशाचे व स्वराज्य फाउंडेशनचे पदाधिकारी,प्रशिक्षक अंकुश कलकुटगी याच सर्व स्तरातून कौतुक होत आहे, 

स्वराज्य फाउंडेशनच्या या यशाबद्दल बोलताना अध्यक्ष किरण माने म्हणाले,तासगावच्या क्रीडा परंपरेला साजेल असे खेळाडू घडविण्यात आम्ही यशस्वी होत आहोत. समरजीत शिंत्रे च्या सुवर्ण पदकाने तासगाव शहरातील खेळाडूंना निश्चितच प्रेरणा मिळेल . विजयी खेळाडू समरजीत म्हणाला, प्रशिक्षक अंकुश कलगुटकी यांनी घेतलेला नियमित सराव  आणि खेळाडूंच्या यश प्राप्तीसाठी आवश्यक असलेली शाब्बासकीची थाप आणि प्रेरणा प्रशिक्षक अंकुश सर व फाउंडेशनचे पदाधिकारी आम्हाला देत असतात, म्हणूनच मी हे यश मिळू शकलो.

या सुवर्ण कामगिरीची दखल घेत तासगाव तालुक्याचे आमदार  रोहित  पाटील यांनी समरजीत शिंत्रे व त्यांचे मार्गदर्शक अंकुश कलगुटकी यांचं कौतुक करत त्यांचा सत्कार केला, त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष  किरण माने, माजी नगराध्यक्ष अजय  पाटील, बाळासाहेब गुरव, फाउंडेशनचे संचालक राजेंद्र चव्हाण, गुंडू थोरबोले, अभिजीत कोळेकर, कबड्डी राष्ट्रीय खेळाडू श्रीपाद थोरबोले हे उपस्थित होते.

Tags: