yuva MAharashtra मुंडे पाठोपाठ आता मंत्री गोरेंची विकेट?

मुंडे पाठोपाठ आता मंत्री गोरेंची विकेट?

सांगली टाईम्स
By -




◼️ मुख्यमंत्री फडणवीस पीडित महिलेला न्याय देणार का?

◼️ पीडितेचा विधानसभा भवन समोर आंदोलनाचा इशारा

◼️ खासदार संजय राऊत यांचीही जहरी टीका 

 सांगली / प्रतिनिधी 

राज्याचे ग्रामीण विकासमंत्री जयकुमार गोरे अडचणीत आले आहेत. एका प्रतिष्ठित घराण्यातील महिलेला त्यांनी नग्न फोटो पाठवीत विनयभंग केल्याच्या प्रकरणात त्यांच्यावर टिकेची झोड उठली आहे. पीडित महिलेने विधानसभा भवन समोर आंदोलनाचा इशारा दिला आहे. तर विरोधकांनी गोरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे टीम देवाभाऊ मधील धनंजय मुंडे पाठोपाठ आता मंत्री गोरे यांचीही विकेट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला अन अवघ्या काही तासातच मंत्री जयकुमार गोरे यांचे विनयभंग कांड चव्हाट्यावर आले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. ऐतिहासिक स्थान असेलल्या एका प्रतिष्ठित घराण्यातील महिलेला मंत्री गोरे यांनी नग्न फोटो पाठविल्याचे प्रकरण समोर आले आहे.

यावरून आरोपांची राळ उठली आहे. पीडित महिलेने विधानसभा भवन समोर थेट आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याशिवाय गोरे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी या मागणी साठी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना भेटण्याचा इशारा दिला आहे. या वादात सामाजिक कार्यकर्त्यां अंजली दमानिया यांनीही उडी घेतली आहे. पीडित महिलेबरोबर आपणही राज्यपाल यांना भेटणार असल्याचे दमानिया यांनी म्हंटले आहे. याशिवाय शिवसेना (ऊबाठा गट) खासदार संजय राऊत, काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवर यांनीही मंत्री गोरे यांच्यावर टिकेची झोड उठवली आहे. दरम्यान गोरे यांनी याबाबतचे सर्व आरोप फेटाळले आहेत. आरोप करणाऱ्यांवर हक्कभंग आणणार असल्याचा इशारा मंत्री गोरे यांनी दिला आहे.

Tags: