तासगाव / प्रतिनिधी
लाईफकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने तासगांवसह परिसरातील रूग्णांची चांगली सेवा केली आहे. यापुढच्या काळातही आरोग्य सेवेचे व्रत कायम राहील असे स्पष्ट करून जास्तीत जास्त रूग्णांना लाभ घेता यावा यासाठी हॉस्पिटलमध्ये महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना सुरू करण्यासाठी आमदार रोहित पाटील प्रयत्न करतील अशी ग्वाही उपस्थित मान्यवरांनी दिली.
लाईफकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजना व महाराष्ट्र कारागृह सुधारसेवा बल कुटुंब आरोग्य योजना या दोन्ही योजनांचा शुभारंभ शनिवारी माजी उपनगराध्यक्ष सी.पी.कांबळे, ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला शहर अध्यक्षा सौ. शुभांगी साळुंखे, सत्वशिला पाटील, संजय चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात आला. सी. पी. कांबळे यांनी लाईफकेअर हॉस्पिटलने रूग्णांना चांगली सेवा दिली आहे असे सांगून नव्याने सुरू केलेल्या योजना प्रामाणिकपणे राबवाव्यात असे स्पष्ट केले.
शुभांगी साळुंखे यांनी कोरोना काळात या हॉस्पिटलने चांगले काम केल्याचे सांगत येथील डॉक्टरांच्यासह सर्व स्टाफ रूग्णांची चांगली सेवा करीत आहेत असे म्हंटले. प्रा. एम. बी. पवार यांनी या हॉस्पिटलने उत्कृष्ट काम केल्याचे सांगितले. अमोल शिंदे यांनी या हॉस्पिटलने अल्पावधीत भरारी घेतल्याचे सांगितले. अभिजीत माळी यांनी हॉस्पिटलने कोरोना काळात आधार वाटेल असे काम केल्याचे सांगितले. अॅड. गजानन खुजट यांनी चांगल्या सुविधा मिळाव्यात असे स्पष्ट केले. निसार मुल्ला यांनी हॉस्पिटलने तालुक्यात वेगळी ओळख निर्माण केल्याचे सांगितले.
डॉ. ज्ञानेश्वर शिवणकर यांनी हॉस्पिटलने प्रामाणिकपणे सेवाभाव जपला आहे. या हॉस्पिटल मध्ये महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना सुरू करण्यासाठी इच्छुक आहोत. लोकप्रतिनिधीनी योजना सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. डॉ. सुधाकर अलमद यांनी स्वागत केले. डॉ.अनिकेत हजारे, प्रथमेश यादव, जहीर नदाफ, संतोष पाटील, प्रताप घाटगे, इंजि. युवराज लुगडे, दादासाहेब गावडे आदी उपस्थित होते. सुत्रंसचलन श्रध्दा खराडे यांनी तर आभार डॉ. विजय माने-पाटील यांनी मानले.

.jpg)