yuva MAharashtra कवठेमहांकाळच्या हायुम सावनुरकर यांना मोठी संधी

कवठेमहांकाळच्या हायुम सावनुरकर यांना मोठी संधी

सांगली टाईम्स
By -
प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार यांच्याहस्ते मिरा - भाईंदर पक्ष निरीक्षक पदी नियुक्तीचे पत्र स्विकारताना हायुम सावनुरकर.

राष्ट्रवादीच्या (शरदचंद्र पवार पक्ष) मिरा - भाईंदरच्या निरीक्षक पदी वर्णी

कवठेमंकाळ / प्रतिनिधी

कवठेमहांकाळ येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) सक्रिय नेते हायुम सावनुरकर यांना पक्षाने मोठी संधी दिली आहे. पक्षाच्या मिरा - भाईंदर पक्षनिरीक्षक पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस रविंद्र पवार यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

सावनुरकर कवठेमहांकाळ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रिय नेते आहेत. अनेकवेळा पक्षासाठी त्यांनी महत्वाची जबाबदारी पार पाडली आहे. कवठेमहांकाळ शहरासह तालुक्यात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. त्यांच्या या कामाची दखल घेत प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी त्यांची मिरा भाईंदर च्या पक्ष निरीक्षक पदी नियुक्ती केली आहे. 

पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सरचिटणीस रविंद्र पवार यांच्या हस्ते देण्यात आले. सावनुरकर यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात कवठेमंकाळ शहरातून केली. त्यांनी स्वर्गीय नानासाहेब सगरे, स्वर्गीय शिवाजी बापू शेंडगे, स्वर्गीय आर. आर. आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक, राजकीय काम केले.  ते आमदार जयंत पाटील, आमदार रोहित पाटील, माजी आमदार सुमनताई पाटील, चेअरमन अनिता सगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष वाढीचे काम करीत आहेत.

Tags: