शनिवारी वितरण ; युवराज शिंदे यांची माहिती
सांगली / प्रतिनिधी
येथील युवा विकास कल्याणकारी सेवाभावी संस्थेच्या वतीने दिला जाणारा सांगली भूषण पुरस्कार यंदा कर्मवीर भाऊराव पाटील सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, 'एबीपी माझा' चे सांगली जिल्हा प्रतिनिधी कुलदीप माने, क्रेझी आईस्क्रीमचे महेश पाटील, स्वच्छ्ता दूत राकेश दड्डनावर, मेजर सतीश पाटील व ज्योती देवकर यांना जाहीर झाला आहे. येत्या शनिवार २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती युवराज शिंदे यांनी दिली.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करत सांगलीचे नाव उंचाविनाऱ्या व्यक्तींना युवा विकास कल्याणकारी सेवाभावी संस्थेच्या वतीने दरवर्षी सांगली भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. याशिवाय वर्षभर विविध सामाजिक उपक्रम, व्याख्याने, चर्चासत्रही आयोजीत केली जातात. दरम्यान यंदाचा सांगली भूषण पुरस्कार कर्मवीर भाऊराव पाटील सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, 'एबीपी माझा' चे सांगली जिल्हा प्रतिनिधी कुलदीप माने, क्रेझी आईस्क्रीमचे महेश पाटील, स्वच्छ्ता दूत राकेश दड्डनावर, मेजर सतीश पाटील व ज्योती देवकर यांना जाहीर झाला आहे.
