![]() |
| समीत पवार |
तासगाव / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य कृषी खते उत्पादक न्याय हक्क समितीची पुणे येथे बैठक नुकतीच पार पडली. समितीच्या राज्य अध्यक्ष पदी समीत पवार तर उपध्यक्षपदी मेघराज निकम व विनोद पवार यांच्या सह राज्य कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
बैठकीत सरचिटणीस रवी नरसाळे, सहचिटनीस जयदीप पाटील, खजिनदार अमोल राठोड, संपर्क प्रमुख राजेश मुकणे, सह संपर्क प्रमुख शिवकुमार शिंदे, प्रवक्ता सुहास थोरवत, सहप्रवक्त स्वप्नील सूर्यवंशी, व्यवस्था प्रमुख इरफान शेख तर पुणे विभागीय अध्यक्ष पदी संदीप पाटील, कोल्हापूर विभाग पदी मदन अनुषे, नाशिक विभाग विक्रांत डिसले , अमरावती पवन झोरे व संभाजीनगर विभागपदी योगेश ढोकळे याची निवड करण्यात आली.
![]() |
| ADVT. |
समितीच्या वतीनेजे कृषी खाते उत्पादक व्यासायिक विना परवाना किंवा जी. एस. टी. काम करतात त्यांना आळा घालणे व नियमात काम करण्यास भाग पाडणे, परवाना धारकांना होणारा शासकीय व अशासकीय त्रास कमी करणे, गुजराथ हुन येणारे अवैध निकृष्ट दरवाजाचे कृषी उत्पादनाने राज्यातील शेतकऱ्यांचे होणारे अतोनात नुकसान व उत्पादन खर्च वाढत आहे त्याला आळा घालणे, राज्यात निकृष्ट दर्जाचे उत्पादन करणारे व्यवसायिक व ते विकणारे दुकानदार याची माहिती शासनास कळवून त्याच्यावर कारवाई करण्यास शासनास मदत करणे, न्याय हक्क समिती मार्फत कृषी मंत्रालयाला निदर्शनास आणून देणे, समिती मध्ये अध्यक्ष असणाऱ्या सदस्यानी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेती तंत्राच्या माध्यमातून मार्गदर्शन करणे या समितीचे उद्दिष्ट आहे अशी माहिती समितीचे राज्य अध्यक्ष समित पवार यांनी दिली.

