आंबेनळी घाटातील कुंभळवणे गावाजवळ गाडीला अपघात
सांगली / प्रतीनिधी
धारातीर्थ गडकोट मोहिमेसाठी सांगली वरून महाबळेश्वर मार्गे पोलादपूर मधील श्री उमरठ या ठिकाणी जात असताना आंबेनळी घाटातील कुंभळवणे गावाजवळ ड्रायव्हरचा पिकप वरील ताबा सुटला आणि पिकअप गाडी पलटी झाली यामध्ये जवळपास १९ धारकरी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णालय, महाड मधील ड्रामा केअर सेंटर आणि खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी तीन ते चार धारकऱ्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
दरम्यान अपघाताची माहिती मिळताच शिवसेना विधिमंडळ उपनेते तथा राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन,खार भूमी मंत्री भरत शेठ गोगावले यांनी तातडीने रुग्णालयात जात जखमी धराकऱ्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली. वैद्यकीय अधिकाऱ्यांना उपचारसंदर्भात सूचना दिल्या.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या वतीने दरवर्षी गड, कोट मोहीम काढण्यात येते. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रासह अन्य राज्यातून हजारो धारकरी सहभागी होतात. यावेळी श्री उमरठ ते श्री रायगड अशी मोहीम आहे. दरम्यान काल रात्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे धारकरी धारातीर्थ गडकोट मोहिमेसाठी सांगली वरून महाबळेश्वर मार्गे पोलादपूर मधील उमरठ या ठिकाणी जात असताना आंबेनळी घाटातील कुंभळवणे गावाजवळ ड्रायव्हरचा पिकप वरील ताबा सुटला आणि पिकप गाडी पलटी झाली यामध्ये जवळपास १९ धारकरी जखमी झाले.
![]() |
| ADVT. |
त्यांना उपचारासाठी पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णालय, महाड मधील ड्रामा केअर सेंटर आणि खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले यामध्ये तीन ते चार धारकरी गंभीर जखमी झाले. ही बातमी समजताच मंत्री गोगावले यांनी महाड मधील ट्रामा केअर सेंटर मध्ये धाव घेत जखमी धारकऱ्यांचे विचारपूस केली. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी सांगलीकडे रवाना केले. यावेळी ॲम्बुलन्स करून देत त्याला पुढील उपचारासाठी सांगलीला पाठवले. सर्व धारकऱ्यांची प्रकृती स्थिर आहे. नशीब बलवत्तर म्हणून गाडी कुठेही घाटामध्ये खाली गेली नाही. मात्र गाडी जागेवर पलटी झाल्याने गाडीतील धारकऱ्यांना जबर जखमा झाल्या आहेत. जे धारकरी गंभीर जखमी आहेत. त्यांना उपचारासाठी सांगलीला पाठविण्यात आले असल्याचे मंत्री गोगावले यांनी सांगितले.


