yuva MAharashtra गुणवत्ता वाढीसाठी 'प्रोजेक्ट समय' उपक्रम

गुणवत्ता वाढीसाठी 'प्रोजेक्ट समय' उपक्रम

सांगली टाईम्स
By -

गुणवत्ता वाढीसाठी प्रोजेक्ट समय उपक्रमंतर्गत परीक्षा देताना महापालिका शाळांतील विद्यार्थी.


सांगली मनपा आयुक्त शुभम गुप्ता; ५ हजारावर विद्यार्थी; परीक्षा सुरू

सांगली / प्रतिनिधी

सांगली,मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या प्राथमिक शाळांमधील ५२४८ विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी 'प्रोजेक्ट समय' हा महत्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाचे ९० दिवस पुर्ण झाले असून याची अंतिम परीक्षा सुरु झाली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता  यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

महापालिकेच्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्याचा अध्ययन स्तर लक्षात घेऊन आराखड्यानुसार दिलेल्या कृतीच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना सराव देऊन त्यांचा अध्ययन स्तर वाढविण्यासाठी ९० दिवसाचा कृती आराखडा तयार केला. या स्तरनिहाय व कृती कार्यक्रमावरती आधारित ९० दिवसांमध्ये विद्यार्थ्यांचा शाळेमध्ये सराव करून घेण्यात आला. जी मुले अभ्यासात मागे आहेत, त्यांचा विद्यार्थ्यांची अध्ययन स्तर वाढविण्यात विशेष तयारी करून घेण्यात आली आहे. या उपक्रमाचा कालावधी पूर्ण झाला असुन त्याबाबतची सर्व शाळाची एकत्रित अंतिम परीक्षा १ ते  ३ जानेवारी अखेर होणार आहे अशी माहिती मनपा शिक्षण विभागाचे प्रशासनअधिकारी रंगराव आठवले यांनी दिली.
 महापालिका शाळांमधील सर्वच विद्यार्थ्यांचा गुणात्मक दर्जा व सर्वांगीण विकास करून एनईपी २०२० ची प्रभावी अंमलबजावणी करणे, अध्ययनस्तर वाढविण्यासाठी ‘प्रोजेक्ट समय’ हा महत्वाकांक्षी उपक्रम दिनांक १ सप्टेबर २०१४ पासुन   सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता  यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत आहे. यासाठीची इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व मुलांची पूर्व चाचणी दिनांक २० ते २२ ऑगस्ट २०२४ रोजी घेण्यात आली आहे. यामधून विद्यार्थ्यांचे सद्यस्थिती काय आहे याची माहिती उपलब्ध करून घेतली, विद्यार्थ्यांच्या मध्ये प्रगती होण्यासाठी ९० दिवसांच्या कालावधीसाठी सदर उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या अंमलबजावणीमुळे इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा भाषा, गणित, इंग्रजी विषयांचा अध्ययन स्तर निश्चितपणे वाढ झाल्याचे दिसून येईल.
महापालिकेच्या प्राथमिक शाळांमधील मुलांमध्ये अध्यापन स्तर वाढविण्यासाठी जास्तीचे प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी शिक्षण विभागातील सर्व आधिकारी व सर्व शिक्षक, बालवाडी शिक्षिका यांची शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीलाच बैठक आयोजित केली होती. इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे अध्ययन स्तर निश्चित करण्याबाबत महापालिका शिक्षण विभाग व डाएट सांगली, केंद्रसमन्वयक व अनुभवी शिक्षक यांच्याशी चर्चा करून या कार्यक्रमाचे नियोजन केले.

शासनाचा बालवाडी ते इयत्ता तिसरी या वर्गाचा भाषा व गणित या विषयांचा अध्ययन स्तर तयार आहेतच. इयता चौथी ते इयत्ता आठवीपर्यंत भाषा व गणित विषयांचे अध्ययन स्तर तयार करणे व इयता पहिली ते आठवी या वर्गाचे इंग्रजी विषयांचे नव्याने अध्ययन स्तर तयार करण्याच्या अनुषंगाने प्रत्यक्ष कामकाज सुरु झाले.  शुभम गुप्ता आयुक्त तथा प्रशासक सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका, डाएटचे प्राचार्य  डॉ. रमेश होसकोटी  यांनी सांगितलेल्या बाबींचा विचार करून मनपा शिक्षण विभाग सांगली येथे भाषा, गणित, इंग्रजी, उर्दू व कन्नड या विषयांचे अध्ययन स्तर निश्चित करण्यासाठी तज्ज्ञ शिक्षकांची कार्यशाळा घेतली. प्रत्येक विषयाचा प्रमुख शिक्षक, तज्ज शिक्षक नेमण्यात आले. व प्रशासन अधिकारी रंगराव आठवले,  लेखाधिकारी गजानन बुचडे लेखाधिकारी,  सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सतिश कांबळे  यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. सर्व केंद्रा समन्वयक, तज्ज्ञ शिक्षक तसेच शिक्षक शंकर ढेरे यांनी गणित, सुनीता देवके यांनी मराठी, मंजुषा सूर्यवंशी  यांनी इंग्रजी, मांतेश कांबळे यांनी कन्नड, असद पटेल यांनी उर्दू या विषयाच्या अनुषंगाने अंतिम चाचणी तयारी केली आहे.

Tags: