![]() |
| श्री संतज्ञानेश्वर महाराज प्राथमिक विद्यालय (१३ नं शाळा) टिव्ही भेट देताना प्रा. जी. के. पाटील, किरण माने व अन्य. |
प्रा. जी. के. पाटील ; संत ज्ञानेश्वर विद्यालयास स्मार्ट टीव्ही भेट
तासगांव / प्रतिनिधी
विद्यार्थी मित्रानो ! आपण भाग्यवंत आहात नव्या शैक्षणिक धोरणानुसार तुम्हाला दिले जाणारे शिक्षण कौशल्यावर आधारित असणार आहे. त्यामुळे तुमच्या अंगी कौशल्य आणि गुणवत्ता यांचा सुरेख संगम झाल्यास भविष्यात रोजगाराच्या संधी चालून येतील त्यामुळे तुमचा भविष्यकाळ उज्वल आहे. असे प्रतिपादन प्रा.जी. के. पाटील यांनी श्री संतज्ञानेश्वर महाराज प्राथमिक विद्यालय (१३ नं शाळा) येथील प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य शंकरराव पाटील यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रा जी. के. पाटील यांनी विद्यार्थी प्रगतीसाठी स्मार्ट टीव्ही स्वराज्य फौंडेशनचे अध्यक्ष किरण माने यांच्या हस्ते शाळेला भेट दिला व शाळेत समृद्ध ग्रंथालय उभारण्यासाठी शिक्षण तज्ज्ञ शितल पाटील, विवेक पाटील, किरण माने या सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करण्याचा मानस व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन खांडेकर यांनी केले मुख्याध्यापक जयंत नाईक यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला सुवर्णा लुगडे मॅडमनी आभार मानले या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा पद्मिनी माने गणपतराव पाटील बापू व परिसरातील माता-भागिनी, नागरीक उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व गुरुदेव कार्यकर्त्यानी उत्कृष्ठ संयोजन केले.
.jpg)
