yuva MAharashtra सांगलीत फ्लॅटमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट

सांगलीत फ्लॅटमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट

सांगली टाईम्स
By -


अपार्टमेंटमधील दहा फ्लॅट्स सह वाहनांच्या काचा फुटल्या

सांगली / प्रतिनिधी

सांगलीच्या गावभागमध्ये एका आपर्टमेंट मधील फ्लॅटमध्ये ठेवण्यात आलेल्या गॅसच्या टाक्यांचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये फ्लॅट मधील केटरर्स साहित्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याचबरोबर आपर्टमेंट मधल्या दहा फ्लॅटच्या काचा, त्याबरोबर तीन वाहनांच्या काचा देखील स्फोटाच्या आवाजाने फुटल्या आहेत.

सांगली शहरातील गावभाग परिसरात असलेल्या एका अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये आज सकाळच्या सुमारास सिलेंडरचा स्फोट झाला. व्यंकटेश केटर्स नामक व्यवसायिकाचा या अपार्टमेंटमध्ये फ्लॅट होता. त्यांच्या फ्लॅटमध्ये सर्व साहित्य आणि गॅसच्या टाक्या ठेवण्यात आल्या होत्या. मात्र गॅस सिलेंडरमधील गॅस लिकेज होऊन सकाळच्या सुमारास अचानक गॅस सिलेंडरच्या टाक्यांचा स्फोट झाला. 

मोठी दुर्घटना टळली 

दरम्यान सिलेंडरच्या स्फोटामुळे मोठी दुर्घटना होण्याचे टळले असून या घटनेमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र फ्लॅटमध्ये ठेवलेल्या व्यंकटेश केटर्सच्या साहित्यांच्या बरोबर फ्लॅट धारकांच्या घरांचे काचा आणि वाहनांच्या काचा फुटल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तसेच या ठिकाणी असणाऱ्या पाण्याच्या टाक्या देखील गॅसच्या स्फोटाच्या आवाजाने फुटलेले आहेत. मात्र हा स्फोट कसा झाला; हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

सिलेंडरचा स्फोट झाल्याने मोठा आवाज झाला. अचानकपणे प्रचंड आवाजाचा स्फोट झाल्याने आपर्टमेंट मधल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं होतं. तर अपार्टमेंटमधील नागरिकांची देखील आरडाओरड व धावपळ सुरु झाली होती. फ्लॅटमधून धूर निघत असल्याने आग वाढू नये या दृष्टीने अग्निशमन विभागाला याबाबत माहिती देण्यात आली. यानंतर अग्निशमन विभागाचे पथक दाखल होऊन यावर नियंत्रण मिळविले.