सांगली / प्रतिनिधी
संजयनगर (सांगली) येथील भारतीय जनता पार्टीच्या वतीने ३५० बांधकाम कामगारांना भांडी पेटी, सुरक्षा पेटींचे वाटप करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधत सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान यापूर्वी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते सुजितकुमार काटे यांनी दिली. यावेळी माजी नायब तहसीलदार गौतम कांबळे, निळकंठ साळुंखे, गिरीश शिंगणापूर, शिवाजी कांबळे, अमोल सदाकाळे,सौ. सुप्रिया साळुंखे, दिलीप मगदूम, बंडू तोडकर, पाटील अण्णा, कल्पना ताटे आदी उपस्थित होते.
