yuva MAharashtra दीपक चव्हाण ' पत्रकार भूषण' पुरस्काराने सन्मानित

दीपक चव्हाण ' पत्रकार भूषण' पुरस्काराने सन्मानित

सांगली टाईम्स
By -


◼️ छावा संघटनेकडून सामाजिक कामाची दखल 

◼️ चव्हाण महापालिकेचे ब्रँड ॲम्बेसीडर

सांगली / प्रतिनिधी

स्वबळावर विवीध नावीन्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबविणारे महापालिकेचे ब्रँड ॲम्बेसीडर तथा युवा पत्रकार दीपक चव्हाण यांना छावा संघटनेकडून नुकतेच 'पत्रकार भूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामुळे चाव्हण यांच्या शिरपेचामध्ये आणखी एक मनाचा तुरा रोवला गेला आहे.

दीपक चव्हाण यांनी पत्रकारितेबरोबर सामाजिक क्षेत्रात नवीन्यपूर्ण उपक्रम राबवत वेगळा ठसा उमठविला आहे. पत्रकारिता, स्वच्छता, स्पीड ब्रेकर रंगविणे, प्लास्टिक मुक्ती मोहिमेसह अन्य सामाजिक कार्यात त्यांनी भरीव काम केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत छावा संघटनेने त्यांना 'पत्रकार भूषण' पुरस्कार जाहीर केला होता.

संघटनेच्या सांगलीत झालेल्या एका कार्यक्रमात त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मातंगी दिव्या धाम (छत्तीसगड) चे पिठाधीश डॉ. श्री.श्री. प्रेमासाई महाराज यांच्या हस्ते आणि संस्थापक अध्यक्ष किरण गायकर आणि भाजपा नेत्या स्वातीताई शिंदे, जिल्हाध्यक्ष नितीनभाऊ शिंदे यावेळी उपस्थितीत होते. 

Tags: