yuva MAharashtra शंभूराजे देसाई यांच्यावर मोठी जबाबदारी

शंभूराजे देसाई यांच्यावर मोठी जबाबदारी

सांगली टाईम्स
By -

 


◼️ सांगलीच्या संपर्क मंत्रीपदी नियुक्ती
◼️ अहिल्यानगरची ही जबाबदारी 

सांगली / प्रतिनिधी

राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांच्यावर शिवसेना पक्षांतर्गत मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पक्षवाढीच्या दृष्टीकोनातून त्यांची सांगली आणी अहिल्यानगर या दोन जिल्ह्याच्या संपर्क मंत्री पदी नियुक्ती करण्यात आली आहे. दोन्ही जिल्ह्यातील संघटन मजबूत करणे, कार्यकर्त्यांना बळ देणे, प्रश्न, समस्या सोडविणे आदी जबाबदारीचा यामध्ये समावेश आहे. 

शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघटनात्मक बांधणीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. पक्ष वाढीसाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. यासाठी त्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना कामाला लावले आहे. शिवसेनेकडे मंत्रिमंडळात ११ खाती आहेत. या माध्यतून असलेल्या योजना, कामे जनतेपर्यन्त पोहचावीत यासाठी शिंदे यांनी एक रोडमॅप तयार केला आहे.

मंत्री असलेल्या नेत्यांना जिल्ह्याचे वाटप केले आहे. त्यांच्यावर संपर्क मंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.उपमुख्यमंत्र्यांचे विश्वासू म्हणून ओळख असलेले पर्यटन मंत्री शम्भूराजे देसाई यांच्याकडे सांगली आणि अहिल्यानगर या दोन जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. 


Tags: