yuva MAharashtra एक मार्चला सांगलीत मराठा उद्योजकांचा मेळावा

एक मार्चला सांगलीत मराठा उद्योजकांचा मेळावा

सांगली टाईम्स
By -


◼️ संतोष पाटील यांची माहिती 
◼️ नरेंद्र पाटील यांची उपस्थिती

सांगली / प्रतिनिधी 

मराठा तरूणांना उद्योग व्यवसायासाठी कर्ज देताना बँकांच्या नियम व अटींमध्ये शिथिलता आणावी, बँकांनी सर्व तरूणांना कर्ज द्यावे यासाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत १ मार्च रोजी सांगलीत उद्योजक मेळावा आयोजित केला आहे अशी माहीती सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटील यांनी दिली.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाचे कर्ज घेण्यासाठी तरुण उद्योजकांना राज्यातील सर्व बँका प्रॉपर्टी तारण दिल्याशिवाय कर्ज देत नाहीत. कर्ज घेण्यासाठी बँका एन.ए. प्लॉट, शेती जमीन, फ्लॅट, राहते घर याची तारण मागतात परंतु काही मराठा तरुणाकडे राहण्यासाठी घर नाही, जमीन नाही, प्लॉट नाही, फ्लॅट नाही असे तरुण उद्योजक बँकांना तारण देऊ शकत नाही. त्यामुळे बँका मराठा तरुण उद्योजकांना कर्ज देऊ शकत नाही. 

याच्यावर तोडगा काढण्यासाठी व भविष्यकाळात मराठा समाजातील नवीन तरुण उद्योजकांना व्यवसायासाठी कर्ज घेण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाकडून बँकांच्या नियमावलीमध्ये बदल करणे आवश्यक आहे. उद्योजक व तरुण होतकरू मराठा समाजातील कार्यकर्त्यांना स्वतःचा उद्योग उभारावा यासाठी हे आवश्यक असुन त्यासाठी मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील हे येणार आहेत.

सांगलीतील व सांगली जिल्ह्यातील सर्व तरुण मराठा उद्योजक व होतकरू तरुणांनी एक शनिवार १ मार्च २०२५ रोजी वारणा मंगल कार्यालय, वसंतदादा मार्केट यार्ड येथे दुपारी बारा वाजता होणाऱ्या या मेळाव्यास उपस्थित रहावे असे आवाहन संतोष पाटील यांनी केले आहे. या वेळी प्रा. नंदकुमार सुर्वे, प्रताप पाटील, महेंद्र शिंदे, प्रथमेश शेटे उपस्थित होते.

Tags: