yuva MAharashtra सांगली आगारातील ११ भंगार बसेस हटवल्या

सांगली आगारातील ११ भंगार बसेस हटवल्या

सांगली टाईम्स
By -



◼️आरटीओने जप्त व कारवाई केलेली अनेक वाहने 

◼️ अनेक वर्षापासून सांगली एसटी आगारातच गंज खात

सांगली / प्रतिनिधी 

 सांगली एसटी आगारातील ११ भांगरवस्थेत पडून असणाऱ्या खासगी शिवशाही बसेस अखेर एसटी महामंडळाने हटविल्या. या ११ शिवशाही बसेस गेल्या पाच वर्षापासून सांगली आगारात पडून होत्या. स्वारगेट प्रकरणानंतर या बसेस हलविण्याची मागणी पुढे आल्यानंतर एसटी विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांच्या आदेशाने आज सांगली आगार व्यवस्थापक राजेंद्र घुगरे यांच्या उपस्थितीत या शिवशाही बसेस कोणतीही नुकसानविना तिथून चंदनवाडी वर्कशॉप याठिकाणी स्थलांतरित करण्यात आल्या. 

यासाठी आटपाडी आणि तासगाव यंत्रशाळा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी  या बसेस तिथून स्थलांतरित केल्या. यामध्ये आटपाडी एसटी आगाराचे सहायक कार्यशाळा अधीक्षक स्वप्नील हसबे, बाळू धेंडे, विक्रम गायकवाड, वैभव दौंड तासगाव, इमरान पठाण आणि शिकवू कामगार यांनी सहभाग घेतला. दुसरीकडे आरटीओ विभागाने जप्त व कारवाई केलेली अनेक वाहने गेल्या अनेक वर्षापासून सांगली एसटी आगारातच गंज खात पडली आहेत. यामध्ये जप्त केलेली वाहने कित्येक वर्षे अक्षरशः गंज खात पडली आहेत. 

आरटीओ ने जप्त केलेली वाहने अशी गंज खात पडली आहेत.

यामध्ये रिक्षा, खासगी आराम बस, आयशर टेम्पो, छोटा हत्ती, पीकअप असा तब्बल ३०हून अधिक वाहने एसटी आवारात आरटीओ विभागाची पडून आहे. त्यामुळे एसटी गाड्या बाहेर लावण्याची वेळ येत आहे. त्यामुळे आरटीओ विभाग आपले जप्त वाहने कधी येथून ताब्यात घेणार अशी चर्चा सुरू आहे.

Tags: