yuva MAharashtra ईव्हीएम म्हणजे "एव्हरी वोट, अगेंस्ट मुल्ला"

ईव्हीएम म्हणजे "एव्हरी वोट, अगेंस्ट मुल्ला"

सांगली टाईम्स
By -

ना. नितेश राणे
मंत्री नितेश राणे; सांगलीत हिंदू व्यावसायिक एकत्रीकरणचा अभिनव उपक्रम ; राज्यभरात पॅटर्न व्हावा

सांगली / प्रतिनिधी
आक्रमक हिंदुत्ववादी विचार मांडणारे भाजपचे आमदार तथा राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी सांगलीत पुन्हा एकदा मुस्लिमांना टार्गेट केले. ईव्हीएम अर्थात "एव्हरी वोट, अगेंस्ट मुल्ला" असे म्हणत हा लाँगफॉर्म लक्षात ठेवण्याचा सल्लाही दिला. मी हिंदू मतांवरच आमदार झालो आहे. मी मतांकरिता त्यांच्या मोहल्ल्यात गेलो नाही. विधानसभेत प्रचंड बहुमत आल्याने विरोधक ईव्हीएमच्या नावाने गळे काढत आहेत. कारण त्यांना हिंदू एकत्र येवू शकतो हे बघवत नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी बोलताना केला. 
हिंदू व्यवसाय बंधू आणि हिंदू एकता आंदोलन यांच्यावतीने आयोजित हिंदू गर्जना सभेत मंत्री राणे बोलत होते. आमदार सुरेश खाडे, आमदार सत्यजीत देशमुख, माजी आ. नितीन शिंदे, माजी आ. दिनकर पाटील, स्वाती शिंदे, नीता केळकर, श्रीरंग केळकर, नंदकुमार बापट, शेखर इनामदार आदी उपस्थित होते. मंत्री नितेश राणे म्हणाले, ज्या देशात ९० टक्के हिंदू राहतात ते हिंदू राष्ट्रच आहे. 
त्याला कोणाच्या परवानगीची गरज नाही. या राष्ट्रात सर्वप्रथम हिंदूचेच हित पाहिले जाणार. आपण धर्माला प्राधान्य दिले पाहिजे. आम्ही कोणाच्या पोटावर लाथ मारणार नाही परंतु आमच्याही पोटावर कोणी लाथ मारु नये अशी आमची भूमिका आहे. हिंदुत्वाच्या दिशेनेच देशाची वाटचाल सुरु आहे. अनधिकृत कोणतेही प्रार्थनास्थळ असो ते पाडलेच पाहिजे. विशाळगडावर रविवारी उरुस भरविण्याचे आयोजन केले आहे. आम्ही देखील बघतोस हा उरुस कसा होतो ते असे आव्हानही याप्रसंगी मंत्री राणे यांनी दिले.
ईव्हीएम म्हणजे "एव्हरी वोट, अगेंस्ट मुल्ला" 
मंत्री नितेश राणे म्हणाले, मी हिंदू मतांवरच आमदार झालो आहे. मी मतांकरिता त्यांच्या मोहल्ल्यात गेलोच नाही. विधानसभेत प्रचंड बहुमत आल्याने विरोधक ईव्हीएम च्या नावाने गळे काढत आहेत. कारण त्यांना हिंदू एकत्र येवू शकतो हे बघवत नाही. ईव्हीएम म्हणे  "एव्हरी वोट, अंगेंस्ट मुल्ला" हा खरे तर त्याचा लॉँगफॉर्म आहे तो हिंदूनी लक्षात ठेवावा.
माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले, जिल्ह्यात बांगलादेशी मुस्लिमांनी घुसखोरी केली आहे. या प्रश्नावर आम्ही आवाज उठविणार आहोत. देशात लव्ह जिहाद, धर्मांतरण, लॅड जिहाद आदी समस्या वाढत आहेत. जेव्हा हिंदू संकटात आला तेव्हा हिंदू गर्जना मोर्चा मदतीसाठी पुढे आला आहे. सभागृहात यापुढील काळातही हिंदूंचे प्रश्न मांडण्याचे काम मंत्री नितेश राणे करतील असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला. स्वागत आणि प्रास्ताविक स्वाती शिंदे यांनी केले. याप्रसंगी मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.




Tags: