yuva MAharashtra सदगुरु तात्यासाहेब कोटणीस महाराजांचा १०१ वा पुण्यतिथी महोत्सव

सदगुरु तात्यासाहेब कोटणीस महाराजांचा १०१ वा पुण्यतिथी महोत्सव

सांगली टाईम्स
By -

श्री. प. पू. सदगुरु तात्यासाहेब कोटणीस महाराज

१३ ते १९ दरम्यान आयोजन ; भजन, पालखी सेवा, प्रवचन, गायन, व्याख्यानाचे आयोजन

सांगली / प्रतिनिधी

प.पू.श्रीसद्गुरु तात्यासाहेब कोटणीस महाराज यांचा १०१ वा पुण्यतिथी महोत्सव आणि नित्य किर्तनाचा शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाचा शुभारंभ कैवल्यधाम येथे १३ ते १९ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या उत्सवात भजन, पालखीसेवा, प्रवचन, व्याख्यान गायन आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ह.भ.प. गुरुनाथ कोटणीस महाराज यांनी दिली. या उत्सवात श्रीऋानेश्‍वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्‍वस्त निरंजननाथ महाराज , रमाकांत व्यास यांची प्रवचने होणार आहेत.
यावेळी ह.भ.प. संजय कोटणीस,धनंजय कोटणीस उपस्थित होते. यावेळी कोटणीस महाराज म्हणाले, १३ जानेवारी रोजी सद्गुरु जनार्दन महाराज यरगट्टीकर, डोंबिवलीचे महेश भावे यांचे प्रवचन,संगीताचार्य द.वि.काणेबुवा प्रतिष्ठान संचलित गुरुकुल संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्याचे गायन सेवा होणार आहे. १४ रोजी ह.भ.प.दिपक केळकर ,वेदमुर्ती विवेकशास्त्री गोडबोले यांचे प्रवचन होणार आहे.तर रात्री ह.भ.प.पराग महाराज यांचे किर्तन होणार आहे. १३ व १४ जानेवारी रोजी दुपारी चार वाजता महेश भावे यांचे श्रीविष्णूसहस्त्रनाम या विषयावर प्रवचन होणार आहे.
१५ जानेवारी रोजी  संध्याकाळी ५.३० वाजता नित्य किर्तनाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाचा शुभारंभ करवीर पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य विद्यानृसिंहभारती स्वामी ,चिमड मठाचे जनार्दन महाराज यरगट्टीकर,श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन,आमदार सुधीर गाडगीळ यांच्या उपस्थितीत  होणार आहे. यावेळी विद्यावाचस्पती पदवी प्रित्यर्थ संजय कोटणीस,धनंजय दिक्षीत यांचा सन्मान करण्यात येणार आहे. वसंतराव आपटे यांचे भारतीय प्रजासत्ताक या विषयावर व्याख्यान,तसेच संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज  चैतन्य महाराज देहूकर यांचे किर्तन होणार आहे.
 १६ जानेवारी रोजी सर्वेश कुलकर्णी,पुणे,सुरतचे आचार्य चंद्रेशजी,यांचे प्रवचन,चैतन्य महाराज यांचे किर्तन होणार आहे. १७ रोजी पंढरपुरचे राणू महाराज वासकर यांचे प्रवचन,पाथर्डीचे मुकुंदकाका जाटदेवळेकर यांचे किर्तन होणार आहे. १८ रोजी विद्यावचस्पती संजय कोटणीस,यांचे प्रवचन,श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदीर समिती पंढरपुरचे गहिनीनाथ महाराज औसेकर यांचे किर्तन होणार आहे. १७ व १८ जानेवारी रोजी अहिल्यानगर येथील भारतीय संस्कृति सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष रमाकांत व्यास यांचे आपुलिया हिता जो असे जागता या विषयावर प्रवचन होणार आहे. १९ जानेवारी रोजी डॉ.शरद गद्रे यांचे काल्याचे किर्तन, दुपारी आराधनेचे कीर्तन, आराधना विधी आदी कार्यक्रम होणार आहेत.
Tags: