![]() |
| श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजीराव भिडे (गुरुजी) यांच्याशी चर्चा करताना राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे. |
सांगली / प्रतिनिधी
राज्याचे मत्स्य व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी आज सांगली येथे श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष संभाजीराव भिडे यांची भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत आशीर्वाद घेतले. मंत्री राणे आज सांगली दौऱ्यावर आहेत. त्यांच्याहस्ते सांगलीत फिश मार्केटचे भूमिपूजन होत आहे. याशिवाय 'हिंदू गर्जना' सभेचेही आयोजन करण्यात आले आहे.
आक्रमक हिंदुत्ववादी नेता म्हणून मंत्री नितेश राणे यांची ओळख आहे. लव्ह जिहाद, धर्मांतरण यावर त्यांनी नेहमीच आवाज उठवला आहे. हिंदू गर्जना मोर्चा, सभेच्या माध्यमातून त्यांनी हिंदू मध्ये जनजागृतीचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केला आहे. नुकतीच त्यांची राज्य मंत्रीमंडळामध्ये मत्स्य व बंदरे विकासमंत्री म्हणून निवड झाली आहे. मंत्री झाल्यानंतर ना. राणे पहिल्यांदाच सांगलीत आले आहेत.
