सांगली / प्रतिनिधी
पालकमंत्री महा आरोग्य व योजना साक्षरता व मोफत जनसुविधा सेवा शिबिर येथील म.के.आठवले विनय मंदिर, राजवाडा, सांगली. येथे आयोजित करण्यात आले होते. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक १६ येथे आरोग्य , योजना साक्षरता व जनसुविधा शिबीर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन आमदार सुधीर गाडगीळ व माजी आमदार नितीनराजे शिंदे यांचे हस्ते झाले. यावेळी भाजपाचे माजीनगरसेविका सौ. स्वातीताई शिंदे, माजी नगरसेवक ऊत्तम साखळकर, भाजपा यूवा नेते सुजीत राऊत, भाजप ज्येष्ठ नेते श्रीकांत शिंदे, मध्य मंडल अध्यक्ष राहुल नवलाई,गजानन नलवडे, आनंदा चिकोडे ईत्यादी नेते व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाला भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ स्वातीताई खाडे व सांगल शहर निवडणुक प्रमुख शेखर इनामदार यानी भेट दिली. कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा प्रसिद्धी प्रमुक केदार खाडीलकर पालकमंत्री कार्यालय समन्वयक विजय वरुडकर, प्रतिनिधी प्रमुख नरेंद्र यरगट्टीकर, यांनी केले.
पालकमंत्री कार्यालय आयोजित जनसुविधा शिबीर अंतर्गत आयुष्मान भारत योजना नोंदणी, नवीन मतदार ओळखपत्र, पदवीधर नोंदणी, ई श्रम कार्ड नोंदणी, नवीन आधार कार्ड अथवा दुरुस्ती, नवीन पॅन कार्ड अथवा दुरुस्ती, आणि उद्यम आधार नोंदणी, बांधकाम कामगार कार्ड नोंदणी, इत्यादी सर्व नोंदणी मोफत करण्यात आल्या. ५०० पेक्षा अधिक नागरिकांनी लाभ घेतला. या प्रसंगी प्रभागातील भाजपाचे मध्यमंडलाचे बहुसंख्या कार्यकर्ते , शक्ती केंद्र प्रमुख व बुथ प्रमुख व भाजपासमर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
