- माजी मंत्री रमेश बागवे यांची उपस्थिती
- संतोष पाटलांचे काम कौतुकास्पद
सांगली / प्रतिनिधी
काँग्रेस प्रवक्ते संतोष पाटील यांचे पदवीधरांसाठी सुरू असलेले काम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार राज्याचे माजी गृहराज्यमंत्री तथा सांगली जिल्हा काँग्रेसचे निरीक्षक रमेश बागवे यांनी येथे बोलताना काढले. श्री. बागवे यांच्याहस्ते काँग्रेस कमिटी येथे पदवीधर व शिक्षक मतदार नोंदणीस प्रारंभ करण्यात आला. दरम्यान काँग्रेसची ताकद भक्कम आहे. सर्वांनी एकत्र येत स्थानिक स्वराज्य स्थानस्थावर काँग्रेसचा झेंडा फडकवावा असे आवाहन श्री. बागवे यांनी यावेळी बोलताना केले.
यावेळी सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार विक्रम सावंत, युवा नेते डॉ. जितेश कदम, प्रवक्ते संतोष पाटील, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे निरीक्षक अमर खानापुरे, काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सिकंदर जमादार, संभाजी पाटील, शिवाजी मोहिते, मार्केट कमिटीचे माजी चेअरमन सुभाष खोत, जैन समाजाचे अल्पसंख्यांचे राज्याचे उपाध्यक्ष देशभूषण पाटील, माजी नगरसेवक राजेश नाईक, मयूर पाटील, प्रमोद सूर्यवंशी, शेवंता वाघमारे, वर्षाताई निंबाळकर, बाबासाहेब कोडग, सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी सेवा दलाचे अध्यक्ष अजित ढोले,पैगंबर शेख, मौला वंटमारे,अमित पारेकर, अनमोल पाटील, स्वप्निल शेटे, सुशांत कदम, एम के कोळेकर, खुदबुद्दीन मुजावर, राजेंद्र कांबळे, आदी उपस्थितीत होते.
