yuva MAharashtra ‘चरैवेति-चरैवेति, यही तो मंत्र है अपना’!

‘चरैवेति-चरैवेति, यही तो मंत्र है अपना’!

सांगली टाईम्स
By -
सांगली नगराच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना विभाग सह संघचालक भगतरामजी छाबडा

- संघाचे जिल्ह्यात संचलन 
- गणवेशधारी स्वयंसेवकांचा सहभाग

सांगली / प्रतिनिधी

 ‘चरैवेति, चरैवेति, यहि तो मंत्र है अपना, नहीं रूकना, नहीं थकना, सतत चलना सतत चलना...’ हा मंत्र घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यरत आहे. संघांचे यंदा शताब्दी वर्ष. त्यानिमित्ताने जिल्ह्यात चोवीस ठिकाणी संचलन आणि ७७ ठिकाणी शस्त्रपूजन उत्सव संपन्न झाले. गणवेशधारी स्वयंसेवकांच्या शिस्तबद्ध संचलनाचे साऱ्यांनी स्वागत केले.

संघाचा शंभर वर्षांचा इतिहास, सामाजिक आव्हाने, समाजाची सहभागिता, संघ कार्याची पद्धती आणि आवश्यकता, देशाच्या जडणघडणीत संघाचे योगदान यानिमित्ताने समाजासमोर मांडण्यात आले. कुटुंब प्रबोधन, स्व बोध, पर्यावरण संरक्षण, समरसता आणि नागरी शिष्टाचार या पंचपरिवर्तनद्वारे समाज परिवर्तन करण्याची भूमिका मांडली गेली. या परिवर्तनाच्या काळात समाजाच्या व्यापक सहभागितेसाठी आवाहन केले गेले. संघाच्या वर्षभरातील समाजाभिमुख कार्यक्रमातील एक भाग म्हणजे विजयादशमी उत्सव आणि संचलन. संघ शताब्दी निमित्त सांगली जिल्ह्यात एकशे एक कार्यक्रम झाले. शहरी भागातील सर्व ७ नगरे आणि ग्रामीण भागातील सर्व ७१ मंडलस्थानी कार्यक्रमांचे  आयोजन करण्यात आले होते. 

सर्व संचलनात संघाचा घोष आकर्षणाचा विषय ठरला. दंडधारी स्वयंसेवक, मध्यभागी भगवाध्वज त्यापाठोपाठ संघ घोष आणि स्वयंसेवक असे संचलन होते. शहरात ठिकठिकाणी संचलनाचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. शिस्तबद्ध संचलनाचे सर्वत्र कौतुक झाले. कोजागरी पौर्णिमेपुर्वी उर्वरित सर्व उत्सव आणि संचलन होणार आहेत. संचलनासाठी सर्व स्तरातील मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. सांगलीतील संचलनात २७० घोष वादक, चार हजार ७२ स्वसंयसेवकांचा सहभाग होता. जिल्हा संघचालक सुधीर चापोरकर, जिल्हा कार्यवाह नितीन देशमाने, शहर संघचालक डॉ. प्रियदर्शन चितळे, विभाग सहसंघचालक भगतरामजी छाबडा, विभाग कार्यवाह विजयराव जोशी, विभाग सहकार्यवाह संजय भागवत यांनी संचलनाची पाहणी केली. राजकारणासह विविध क्षेत्रातील स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

Tags: