- आम्हाला सार्थ अभिमान
- 'स्वराज्य' चे संतोष कदम यांच्याकडून कौतुक
जर्मनी देशात जाऊन योगेशने मिळवलेल्या यशाचा आम्हाला अभिमान - संतोष कदम
मुंबई / प्रतिनिधी
शिक्षणाची आवड, मनात जिद्द असेल तर यश हमखास मिळतेच. माईंगडेवाडी (ता. पाटण) या गावातील योगेश कदम याने बर्लिंग (जर्मनी) येथे पदवीचे शिक्षण पूर्ण (एमबीए इन एनर्जी मॅनेजमेंट) करत यश संपादन केले. स्वराज्य पक्षाचे मुंबई विभाग आघाडीचे युवकचे अध्यक्ष संतोष कदम यांनी योगेशची भेट घेत त्याचा सत्कार केला. त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
योगेश हणमंत कदम हा पाटण तालुक्यातील माईंगडेवाडी गावचा सुपुत्र. सद्या सह्याद्री नगर चारकोप कांदिवली येथे वास्तव्यास असून प्रचंड मेहनती हुशार आणि जिद्दी युवक आहे. आपल्याला चांगले घडायचे असेल काहितरी नवीन करायचं असेल आणि उज्वल भविष्य घडवायचं असेल तर ते चांगलं शिक्षण घेऊनच होऊ शकत त्याची जिद्द आणि वडिलांची साथ त्याला लाभली त्याने शिक्षणासाठी थेट जर्मनी गाठली.
खुप संघर्ष करत शिक्षण चालू ठेवलं बर्लिन या जर्मनीच्या राजधानीत एमबीए इन एनर्जी मॅनेजमेंट ही पदवी प्राप्त केली. आपल्या भारत देशात आला तेव्हा छत्रपती संभाजीराजे महाराज यांच्या स्वराज्य पक्षाचे मुंबई युवक अध्यक्ष संतोष कदम यांनी त्यांचा सत्कार केला सोबत तानाजी कदम उपस्थित होते.
योगेश कदम यांचे सर्वत्र कौतुक होत आहे स्वराज्य पक्ष सरचिटणीस धनंजय भाऊ जाधव यांनीही कौतुक केले योगेशचा अनेक ठिकाणी सत्कार सोहळा मोठ्या प्रमाणात होत आहेत भविष्यात योगेश कदम हा युवकांसाठी प्रेरणा म्हणुन उभा राहील त्याच्या पुढील वाटचालीला खूप शुभेच्छा. तो नेहमी यशस्वी व्हावा. त्याचा आम्हाला अभिमान आहे असे संतोष कदम यांनी म्हटले.
