![]() |
| शक्तीपीठ महामार्ग संदर्भात आमदार सुधीर गाडगीळ यांना निवेदन देताना शक्तिपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीचे शिष्टमंडळ. |
आमदार सुधीर गाडगीळ; मुख्यमंत्र्यांची तातडीने चर्चा करणार
सांगली / प्रतिनिधी
शक्तीपीठ बाबत शेतकऱ्यांच्या ज्या भावना आहेत. तश्याच भावना माझ्या आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, यासाठी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करू. शेतकऱ्यांच्या भावना त्यांच्या कानावर घालू, अशी ग्वाही आमदार सुधीर गाडगीळ यांनी शक्तिपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिली.
कॉम्रेड उमेश देशमुख यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळात प्रवीण पाटील, उत्तम शिंदे, पांडुरंग गुरव, रघुनाथ पाटील, गजानन हरगुडे, विक्रम हरुगडे, राजेश पाटील,अधिकराव शिंदे, राजीव एडके, श्रीकांत पाटील, दिगंबर शिंदे, अनिल कोकाटे, सुधाकर पाटील, उमेश एडके, उत्तम शिंदे ,प्रशांत शिंदे यांचा समावेश होता.
आमदार गाडगीळ म्हणाले, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करू. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही असा तोडगा काढायचा प्रयत्न करू. दरम्यान शक्तिपीठ महामार्गामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होणार आहे. विशेषत: बागायत जमिनी महामार्गात गेल्यामुळे हे नुकसान गंभीर स्वरूपाचे असेल,असेही शिष्टमंडळाने आमदार गाडगीळ यांच्या निदर्शनास आणून दिले.

