![]() |
| मणेराजुरी येथे शेतकऱ्यांना ॲग्री स्टॅक योजनेची माहिती देताना मंडल अधिकारी राजेश्री सानप. बाजूस शेतकरी. |
तासगाव / राजाराम गुरव
मणेराजुरी महसुल सर्कलमध्ये कार्यालयीन कामकाज गतीमान अभियान कृती आराखडाचे शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. तासगाव तहसील कार्यालय व महसुल मणेराजुरी मंडल विभाग यांच्या वतीने सन २०२५ चा कार्यालयीन कामकाज गतीमान करण्यासाठी शिबीराचे आयोजन करण्यात आले. या अभियानस ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे मंडल अधिकारी राजेश्री सानप यानी सांगीतले.
या शिबीराच्या माध्यमातून मणेराजुरीमध्ये ८३९ ॲग्री स्टॅक नोंदणी करण्यात आली. योगेवाडी, गव्हाण या गावातील १०० टक्के रब्बीची पाहणी करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून श्रावणबाळ योजना, शेतकऱ्यांचे आयडी कार्ड काढणे, संजय गांधी योजना, लक्ष्मीमुक्ती योजना, चावडी वाचन, मृत व्यक्ती नावे नोंदणी व वारसा नोंदी, पानंद रस्ते तसेच इतर योजनाची माहिती देणे सुरु असून लाभार्थी वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.
यासाठी गावकामगार तलाठी प्रकाश पांढरे व मंडल अधिकारी राजेश्री सानप सहकार्याबरोबर काम करत आहेत. तासगाव तालुक्यात सर्वात जास्त काम मणेराजुरी मंडलामध्ये झाले आहे. जास्तीत जास्त योजनांचा लाभ शेतकरी व ग्रामस्थांनी घ्यावा असे अवाहन करण्यात आले आहे.
