- १५७ खेळाडूंचा सहभाग
सांगली /प्रतिनिधी
सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीराम प्रतिष्ठान, सांगली यांच्या वतीने “खेलो सांगली 2025” भव्य बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्याला मोठा प्रतिसाद लाभला. या स्पर्धेचा शुभारंभ सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेचे उपायुक्त राहुल रोकडे व सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दीपक सूर्यवंशी तसेच डॉ. आशिष मगदुम यांच्या हस्ते करण्यात आला.
स्पर्धेमध्ये एकूण १५७ खेळाडूंनी सहभाग नोंदवला असून, बक्षीस वितरण समारंभ रविवारी पार पडणार आहे. या समारंभाला भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या उपक्रमादरम्यान भागातील सामाजिक कार्यकर्ते अजय देशमुख यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमावेळी श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यासह चंद्रकांत घुणके, संजय कुलकर्णी, धनेश कातगडे, योगेश कापसे, शशिकांत टेके, दरीबा बंडगर, सुहास ऐवळे, रोहित जगदाळे, विलास सर्जे, सुनिल भोसले, रविंद्र ढगे, अजय देशमुख, प्रियनंद कांबळे, विवेक जाधव, प्रसाद वळकुंडे, दीपक वायदंडे, अरुण हातागळे, प्रणव गुडसे, शिरीष कुडलापगोळ आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेचे यशस्वी आयोजन विशाल भगत व ऋषी जोशी यांनी केले.
