- खासदार श्रीकांत शिंदे
- मुरबाड मध्ये शिवसैनिकांशी संवाद
मुरबाड / प्रतिनिधी
मुरबाडमध्ये गेल्या अडीच वर्षात विकास कामांसाठी १०० कोटींपेक्षा जास्त निधी मिळाला आहे. आणि नियोजन समितीच्या माध्यमातून ४० कोटी निधी मिळाला आहे. यामुळे अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. भविष्यात देखील जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात येईल, अशी ग्वाही आज शिवसेना मुरबाड तालुका वतीने आयोजित शिवसेना कार्यकर्ता संवाद मेळाव्याला संबोधित करताना दिली. या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शिवसैनिकांना आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने संबोधित केले.
गेल्या अडीच वर्षात उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेबांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात जनकल्याणाच्या अनेक योजना राबविल्या आणि त्या योजना महाराष्ट्राच्या गावागावात पोहचविण्याचे काम केले. लाडकी बहिण योजनेसारखी महत्वाकांक्षी योजना राबविली. यामुळे नुकत्याच विधानसभा निवडणुकीत सर्व माता - भगिनींनी महायुतीला मोठा विजय मिळवून दिला, असे यावेळी सांगितले. उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आजही एका कार्यकर्त्यासारखे पक्षासाठी काम करतात.
त्यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली पक्षाच्या माध्यमातून अनेक जनकल्याणाची कामे मार्गी लागत आहेत. यामुळे शिवसेनेत राज्यभरात विविध पक्षातून नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. याच पार्श्वभूमीवर आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वांनी एकत्रित मिळून काम करा, व शिवसेनेला आणि महायुतीला मोठ यश मिळवून देण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन यावेळी केले. सर्व शिवसैनिकांनी यास उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन विजयाचा संकल्प केला.
यावेळी आमदार शांताराम मोरे, शिवसेना नेते प्रकाश पाटील, सचिव भाऊसाहेब चौधरी, सह सचिव एकनाथ शेलार, उपनेते रूपेश म्हात्रे, उपनेते निलेश सांबरे, जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, मदनबुबा नाईक, कांतीलाल कंठे, संतोष जाधव यांच्यासह स्थानिक, कार्यकर्ते, महिला आघाडी व पक्षाचे स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
