- माजी आमदार नितीन शिंदे
- कोल्हापूरमध्ये ‘हिंदू एकता’च्या शाखेचे उद्घाटन
सांगली। प्रतिनिधी
भारत हिंदू राष्ट्र आहे. इथे मुघलांच्या नावांचे उदात्तीकरण चालणार नाही. राज्य सरकारने अनेक शहरे, गावांना असणारी मुघलधार्जिनी नावे बदलली. पण काहींचा त्याला विरोध सुरु आहे. ज्यांना छत्रपती संभाजीनगर, राजमाता अहिल्यानगर, ईश्वरपूर या नावांना विरोध करायचा आहे, त्यांनी खुशाल पाकिस्तानमध्ये जावे. हिंदूनी अशा प्रवृत्तींना महाराष्ट्रात फिरू देऊ नये असे आवाहन हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार नितीन शिंदे यांनी केले. यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष विनायक पावसकर उपस्थित होते.
कोल्हापूर येथील राजारामपूरी गल्ली क्रमांक १२ येथे हिंदू एकता आंदोलनाच्या शाखेचे उद्घाटन माजी आमदार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, हिंदूवर अत्याचार करणार्या मुघलांची नावे काही शहरे, गावांना आहेत. राज्यातील हिंदुत्ववादी सरकारने ही नावे बदलायला सुरवात केली आहे. छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, धाराशिव, ईश्वरपूर अशी नामांतरे करण्यात आली. पण काही प्रवृत्तींना हे खुपते आहे. सर्वधर्म समभावच्या नावाखाली नामांतरास विरोध होतोय. अशा प्रवृत्तींना हिंदूनी थारा देऊ नये. विशाळगडावर मलिके रेहानच्या दर्ग्याचे उदात्तीकरण सुरु आहे. दुर्दुेवाने काही हिंदूच्या घरातही या रेहानची छायाचित्रे आहेत. हिंदूनी त्याची होळी करावी. रेहान हा हिंदूनी मारलेला सरदार होता, याचे भान ठेवावे. या विरोधात लढा सुरु आहे. त्यास बळ देण्यासाठी हिंदू एकताच्या प्रवाहात जास्तीत जास्त हिंदूनी सहभागी व्हावे असे आवाहन शिंदे यांनी केले.
संघटनेचे कार्याध्यक्ष पावसकर म्हणाले की, हिंदू एकताचा कार्यकर्ता असलेला शैलैश पवार शहीद झाले. त्यांचे बलीदान वाया जाऊ देऊ नका. कोल्हापूर जिल्हाध्यक्ष गजानन तोडकर म्हणाले, एमआयएमकडून सातत्याने हिंदूबाबत गरळ ओकली जात आहे. या पक्षाच्या नेत्याचा दौरा हिंदू एकताच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावला. दत्तात्रय भोकरे म्हणाले की, हिदू एकता आंदोलन ही आक्रमक संघटना आहे. यापुढच्या काळात ती अधिक आक्रमक होईल. यावेळी पदाधिकार्यांच्या निवडीचे पत्रे देण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष म्हणून विलास मोहिते, शाखाध्यक्ष म्हणून कुमार काटकर, शाखा उपाध्यक्ष म्हणून विजय बोंद्रे यांची निवड करण्यात आली. सांगली जिल्हा अध्यक्ष संजय जाधव, मिरज शहराध्यक्ष सोमनाथ गोटखिंडे, सांगली शहर उपाध्यक्ष अनिरुद्ध कुंभार, गावभाग शाखाध्यक्ष गजानन माने, वैशाली बोंद्रे, वैशाली मोहिते, मेघा चंडाळे, नेहा चंडाळे, स्वरा बोंद्रे, प्रेम देसाई, हिंदुराव शेळके, बापू वडगावकर आदी हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी स्वागत व प्रस्ताविक हिंदू एकता आंदोलनाचे कोल्हापूर जिल्ह्या अध्यक्ष दीपक देसाई यांनी केले.
