- वंचीतचे अध्यक्ष प्रकाश आंबडेकर
- मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्याकडे मागणी
सांगली। प्रतिनिधी
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमीत्त येणार्या अनुयायांसाठी टोल माफ करावा अशी मागणी वंचीत बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी खासदार अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रामध्ये असे म्हंटले आहे की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ६९ वर्षांपूर्वी विजयादशमी दिनी, १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. हा दिवस जगभरातील अनुयायांसाठी सन्मानाचा आणि मुक्तीचा दिवस आहे. बौद्ध अनुयायी दरवर्षीप्रमाणे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त हा सोहळा साजरा करतात. यावर्षी १ ते ४ ऑक्टोबर २०२५ दरम्यान दीक्षाभूमी नागपूर, बौद्ध लेणी औरंगाबाद, अकोला तसेच महाराष्ट्रातील इतर ठिकाणी लाखो बौद्ध अनुयायी हा सोहळा साजरा करण्यासाठी प्रवास करणार आहेत.
![]() |
| ADVT. |
पण एवढ्या मोठ्या धार्मिक आणि सांस्कृतिक सोहाळ्यांसाठी प्रवास करणार्या बौद्ध अनुयायांकडून टोल वसूल केला जातो. महाराष्ट्र आणि देशभरातील ग्रामीण भागातून लोक तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी बौद्ध वारसा स्थळांना भेट देतात. त्यामुळे मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मागणी करतो की, धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त महाराष्ट्रभर प्रवास करणार्या बौद्ध अनुयायांसाठी आकारला जाणारा टोल माफ करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

