yuva MAharashtra सांगलीत सहकार भारतीचे संस्थापक स्व. लक्ष्मणराव इनामदार यांना अभिवादन

सांगलीत सहकार भारतीचे संस्थापक स्व. लक्ष्मणराव इनामदार यांना अभिवादन

सांगली टाईम्स
By -


 -  सहकार भारतीचा संपूर्ण देशात विस्तार

सांगली / प्रतिनिधी 

सहकार भारती सांगली महानगर शाखेतर्फे रविवार दि.२१ सप्टेंबर रोजी सहकार भारतीचे संस्थापक स्व. लक्ष्मणराव इनामदार यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी सांगली अर्बन बँकेचे संचालक संजय धामणगावकर आणि रा.स्व.संघाचे महानगर सहकार्यवाह योगेश शिरगुरकर, किरण जाबशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. 

यावेळी बोलताना श्री. संजय धामणगावकर म्हणाले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक असलेले  स्व. लक्ष्मणराव इनामदार आणि सांगली अर्बन बँकेचे संस्थापक स्व. अण्णा गोडबोले आणि अन्य सहकारी यांनी १९७८ साली सहकार भारतीच्या कार्याची सुरवात केली. “विना संस्कार नही सहकार...विना सहकार नही उद्धार” हे ब्रीदवाक्य घेवून सहकार भारतीचे कार्य संपूर्ण भारतात विस्तारले आहे. महानगर महामंत्री शैलेश पवार यांनी सहकार गीत सांगितले. 

Advt.

यानंतर प्रमुख पाहुण्यांचा परिचय आणि सूत्रसंचालन सहकार भारतीचे महानगर संघटन प्रमुख संदीप कुलकर्णी यांनी केले. या कार्यक्रमास सहकार भारतीचे प्रदेश संपर्क प्रमुख संजय परमणे, महानगर उपाध्यक्ष किशोर शहा, महानगर बँक प्रकोष्ठ प्रमुख व सांगली अर्बन बँकेचे संचालक सागर घोंगडे, पदाधिकारी अमोल बोळाज, सुषमा कुलकर्णी, धीरज नसलापुरे, अवधूत ठोके, स्वाती सावळवाडे, श्रुती जोशी, सुनेत्रा रजपूत, सुरेश कोरे, अशोक जाधव, मोहित डुबल आदि पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: