- जेष्ठ नेते मुकुंद पवार यांची मागणी
- पुण्यात लवकरच चर्चासत्र
पुणे / प्रतिनिधी
महाराष्ट्र गॅझेट मधील नोंदीनुसार वडार समाजाचा एसटी (ब) प्रवर्गात समावेश करावा अशी मागणी समाजाचे जेष्ठ नेते मुकुंद पवार यांनी भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांच्याकडे केली आहे. पवार यांनी वडार समाजाच्या शिष्टमंडळासह पुणे येथे आमदार दरेकर यांची भेट घेतली.
या शिष्टमंडळामध्ये राज्य मजूर फेडरेशनचे अध्यक्ष संजय कुसाळकर, सोलापूरचे मनोहर मुधोळकर, अप्पाराव इटेकर, नागनाथ मंजेली, पुण्याचे रमेश शिंदे, शाम विटकर, बालाजी शिंदे, चंदर मुधोळ, हरिष बंडीवडार, लक्ष्मण चौगुले यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुकुंद दादा पवार यांनी सांगितले की, “कोणत्याही एका संघटनेचे नाव न घेता सकल वडार समाज या नावाखाली पुण्यात लवकरच चर्चा सत्र आयोजित केले जाणार आहे.
![]() |
| ADVT. |
या सत्रासाठी वडार समाजातील सर्व संघटनांचे प्रतिनिधी आणि प्रमुख कार्यकर्ते यांना निमंत्रित केले जाईल.” या चर्चासत्राचे मुख्य समन्वयक म्हणून जबाबदारी सोलापूरचे मा. श्री. मनोहर मुधोळकर (मो. 94224 59447) यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

