![]() |
- संतोष पाटील यांची माहिती
- नाल्यांना नैसर्गिक ढाळ गरजेचा
सांगली / प्रतिनिधी
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची स्थापना होऊन २६ वर्षे झाली. तरीही शामरावनगर मधील नागरिकांचे प्रश्न सुटलेले नाहीत. पाणी निचरा समस्या कायम आहे. नैसर्गिक ढाळ नसल्याने पाणी निचरा होत नाही. नैसर्गिक नाल्यांवर झालेले अतिक्रमण, नाल्यांचा प्रवाह वळविण्यात आला आहे. मनपा आयुक्त सत्यम गांधी यांनी असे नाले तातडीने खुले करावेत. नाल्यावरील अतिक्रमण हटवावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटील यांनी केली आहे.
पाटील यांनी नागरिकांसह आज शामरावनगरची पाहणी केली.पुढे बोलताना पाटील म्हणाले, पूर्वी पावसाचे पाणी नाल्याद्वारे आपोआप पाणी नदीमध्ये जाऊन मिसळत होते. पूर्वीचा नैसर्गिक नाला होता तो नाला ठिक-ठिकाणी लोकांनी आपल्या सोयीनुसार, वाटेल तसा, पाहिजे तिकडे वळवला आहे. त्यामुळे पाणी सरळ न जाता ते पावसाचे पाणी तिथेच थांबून रहिवाशांच्या घरामध्ये घुसत आहे.
ज्या पद्धतीने अलमट्टी धरणाची उंची वाढल्यापासून सांगली,कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील भाग पाण्याखाली जातो. कारण त्या पाण्याला पुढे मार्ग नसल्यामुळे बॅकवॉटर आल्यामुळे ते पाणी नदीच्या काठावर असणाऱ्या लोकवस्तीमध्ये आसपास त्या भागांमध्ये घुसत आहे. त्याच पद्धतीने शामरावनगर मधील नाले हे नैसर्गिक नाले आपल्या मर्जीनुसार तेथील काही लोकांनी आपल्या उद्योगासाठी त्या नाल्या वरती उद्योग सुरू केल्यामुळे ते नाले इकडून तिकडून वळवल्यामुळे मुसळधार पडलेल्या पावसाचे पाण्याचा निचरा न झाल्यामुळे ते पाणी रस्त्यावर व लोकांच्या घरात घुसते हे मूळ कारण आहे.
![]() |
| Advt. |
त्यामुळे सांगली महानगरपालिकेचे आयुक्त याने मुळापासून ही संपूर्ण यंत्रणा राबवून, कोणाचीही भिड-भाड न ठेवता महापालिकेचे आयुक्त व प्रशासनाने ही जबाबदारी स्वीकारून नैसर्गिक नाले सुरू केल्याशिवाय पाण्याचा निचरा होणार नाही हे खरे आहे. त्यामुळे महापालिकेच्या आयुक्तांनी ही सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन शामराव नगर मधील पाण्याचा निचरा करावा. जे पूर्वीचे नाले होते ते नाले पूर्ववत केले तरच शामराव नगरचा प्रश्न सुटेल. अशी प्रा.नंदकुमार सुर्वे, महेंद्र शिंदे, खुदबुद्दीन मुजावर, एम. के. कोळेकर, प्रथमेश शेटे, अब्बास भाई जमादार, मोसिन शेख यांच्यासह तेथील नागरिक उपस्थित होते. या वेळेला सर्वांनी महापालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणा दिल्या.

