![]() |
| भक्ती मिरजकर |
- भक्ती मिरजकर आक्रमक खेळाडू
सांगली / प्रतिनिधी
सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशनची उत्कृष्ट खेळाडू भक्ती मिरजकर हिची महाराष्ट्र राज्य सिनियर महिला संघा मध्ये निवड झाली आहे. भक्ती मिरजकर ही होतकरू खेळाडू असून गेली दहा- बारा वर्ष ती सराव करत आहे.
या निवडी मुळे क्रिकेट सांगली जिल्हा क्रिकेट खेळाडूंमध्ये व तिच्या कुटूंबियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या निवडीसाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार संजय बजाज व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे टूरनामेंट कमिटी चे सदस्य निलेश शहा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
