![]() |
- मंत्री शंभूराजे देसाई
- तब्बल ४५ गावांतील ४०० पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
- पाटणकर गटाला धक्का
पाटण / प्रतिनिधी
राज्याचे खणीकर्म मंत्री शंभूराजे देसाई यांच्या नेतृत्त्वात सातारा जिल्ह्यामध्ये शिवसेना अधिक भक्कम होत आहे. पाटण विधानसभा मतदारसंघातील तब्बल ४५ गावांतील ४००हून अधिक पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी पाटणकर गटातून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. लोकनेते बाळासाहेब देसाई जन्मशताब्दी स्मारक, दौलतनगर येथे पार पडलेल्या भव्य पक्ष प्रवेश समारंभात समस्त नूतन प्रवेशकर्त्यांचे मंत्री देसाई यांनी पक्षात स्वागत केले. त्यांच्या निर्णयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी येरफळे, बेलवडे, वजरोशी, जांभेकरवाडी, तोंडोशी, बोर्गेवाडी घोट, कडवे बुद्रुक, देवाचा माळ मुरुड, डिगेवाडी मुरुड, उमरकांचन, बनपूरी, मसुगडेवाडी, दाढोली, खराडवाडी, सुर्याचीवाडी, चाफळ, जाळगेवाडी, आबईचीवाडी, आरेवाडी, वस्ती साकुर्डी, मल्हारपेठ, चोपडी, बहुले, दिवशी बुद्रुक, नाटोशी, कोकीसरे, मोरगिरी, मोरेवाडी पेठशिवापूर, डिगेवाडी आडूळ, पिंपळोशी, मरळी, कोरिवळे, मणदुरे, काढोली, गोकूळनाला, कळंबे, गारवडे, जरेवाडी, माईगडेवाडी, आडुळ, नुने, केळोली आणि इतर गावांतील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
पक्षात नव्याने प्रवेश केलेल्या समस्त कार्यकर्त्यांना पक्षात योग्य ती संधी आणि सन्मान देण्यात येईल, हा विश्वास मंत्री देसाई यांनी दिला. नूतन प्रवेश केलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मनोगत मांडले की, शिवसेना हाच सामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. शिवसेनेत समाजकल्याणासाठी काम करून समाजासाठी असलेले आपले कर्तव्य पार पाडू, असा संकल्प नूतन कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. सर्वांचे अभिनंदन केले आणि एकजुटीने पक्ष संघटना तसेच पक्ष विस्ताराचे कार्य करून त्या माध्यमातून तालुक्याचा विकास साधू, असे आवाहन केले.

