- आमदार गोपीचंद पडळकर
- हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा
सांगली / प्रतिनिधी
आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील बिरोबा बनामध्ये आमदार गोपीचंड पडळकर यांच्याकडून मंगळवार दि. ३० रोजी सायंकाळी ४ वाजता दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात आमदार पडळकर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान या मेळाव्याची जय्यत तयारी झाली आहे. या मेळाव्या महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून लाखो समाज बांधव उपस्थित राहतील अशी अशी माहिती आमदार पडळकर यांनी दिली.
आमदार पडळकर यांच्याकडून दरवर्षी आरेवाडी येथील बिरोबा बनामध्ये दसरा मेळाव्याचे आयोजन केले जाते. लाखोंची गर्दी होते. आमदार पडळकर यांचे विचार ऐकण्यासाठी केवळ धनगर बांधवच नव्हे तर राज्यातील भटक्या विमुक्त जाती, जमातीसह सर्व धर्म, जातीचे लोक या मेळाव्यास आवर्जून उपस्थित राहतात. यंदा 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता मेळावा होणार आहे. या मेळाव्याची जोरदार तयारी सुरु आहे. आमदार पडळकर यांनी सोमवारी बिरोबा देवाचे दर्शन घेत तयारीची पाहणी केली. देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकार्यांशी चर्चा केली.
दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांच्यावर आक्षेपार्ह टिकेनंतर आमदार पडळकर यांच्यावर चाहोबाजूंनी टिकेची झोड उठली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने सांगलीत मोर्चा काढत आमदार पडळकर यांच्यासह भाजपावर टिकास्त्र सोडले होते. त्याला पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले होते. राष्ट्रवादीला उत्तर देण्यासाठी 1 ऑक्टोंबर रोजी इशारा सभेची घोषणा केली होती. परंतू ही सभा आता ऑनलाईन होणार आहे. दरम्यान दसरा मेळाव्यात आमदार गोपीचंद पडळकर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आमदार जयंत पाटील वाद, धनगर आरक्षण, ओबीसी आरक्षणावर ते काय बोलणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
