yuva MAharashtra जीवनावश्यक वस्तूंचे ३२०० किट, ६०० ब्लँकेट अन् बरेच काही..!

जीवनावश्यक वस्तूंचे ३२०० किट, ६०० ब्लँकेट अन् बरेच काही..!

सांगली टाईम्स
By -


- कोल्हापूर काँग्रेसची पूरग्रस्तांना मदत
- २८ वाहने मदतीसह मराठवाड्याकडे रवाना

सांगली / प्रतिनिधी

मराठवाड्यातील भीषण परिस्थितीमुळे शेतकरी, नागरिक, व्यापारी हवालदिल झाले आहेत. राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. कोल्हापूर काँग्रेसनेही मदतीचा हात दिला आहे. भीषण पुरपरिस्थितीचा सामना करत असलेल्या मराठवाड्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा कठीण समयी आपले उत्तरदायित्व म्हणून कोल्हापूर काँग्रेसने मदतीचे आवाहन केले होते. याला सामान्य नागरिकांपासून ते दानशूर व्यक्तींनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत उदारमताने जीवनावश्यक वस्तूरूपात मदत जमा केली.

सोमवारी जीवनावश्यक वस्तूंनी भरलेले २८ वाहनांसहित काँग्रेस कार्यकर्ते कसबा बावडा येथील बहुशस्त्रधारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन करून आदरणीय खासदार शाहू छत्रपती महाराज, आमदार जयंत आसगावकर, माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, ऋतुराज पाटील, राजूबाबा आवळे यांच्या उपस्थितीत मराठवाड्याकडे रवाना झाले. 

यामध्ये ३२०० जिवनावश्यक वस्तूंचे किट्स, ६०० ब्लँकेट्स यासह प्रथोमोपचार साहित्य पाठवण्यात आले. परभणी, लातूर, धाराशिव, नांदेड, आणि सोलापूर या जिल्ह्यामध्ये ही मदत वितरीत केली जाईल. यावेळी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस सुर्यकांत पाटील- बुद्धीहाळकर, सचिन चव्हाण, राजू लाटकर, राहुल बजरंग देसाई, सरलाताई पाटील, भारतीताई पोवार, संतोष पाटील यांच्यासह माजी नगरसेवक, गोकुळ, शेतकरी संघ, मार्केट कमिटीचे संचालक तसेच शेकडो काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. 


Tags: