yuva MAharashtra कोल्हापूर मनपावर भगवा फडकवण्यास सज्ज व्हा

कोल्हापूर मनपावर भगवा फडकवण्यास सज्ज व्हा

सांगली टाईम्स
By -

 - आमदार राजेश क्षीरसागर

- कोल्हापुरात पदाधिकारी व शिवसैनिकांचा मेळावा

कोल्हापूर / प्रतिनिधी

कोल्हापूर महापालिकेवर भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष तथा कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले. छ. शिवाजी पेठ विभागाच्या वतीने आगामी महानगरपालिका निवडणूकिसाठी पदाधिकारी आणि शिवसैनिक यांचा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. 

यावेळी बोलताना आमदार क्षीरसागर म्हणाले, शिवसैनिकाना न्याय देण्यासाठी एकजुटीने कामाला लागा. कोल्हापूर उत्तर मधील ३० जागा मिळवण्यासाठी माझा प्रयत्न असून इतर दिलेल्या महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी ठाम उभे रहा आणि महापालिकेवर भगवा फडकवण्यास सज्ज व्हा.  मतदारांनी ठरवलं आहे महायुतीचा महापौर महापालिकेत करायचा, तसेच  शिवसेनाप्रमुखांच्या विचारांवरील विश्वासामुळे शिवसेनेचा जनाधार वाढला आहे. विनाकारण खोटे आरोप करून बदनाम केले जाते अश्या आरोपाला कामातून उत्तर द्या. गेली अनेक वर्षे महापालिकेवर सत्ता भोगणाऱ्या काँग्रेसला जाब विचारा, तसेच ८१ जागांवर महायुतीचे नगरसेवक निवडून येतील, यात शंका नसून यासाठी या कार्यकर्त्यांच्या निवडणुकित कार्यकर्त्यांना निवडून आणायची जबाबदारी घेऊन आम्ही नेते मंडळी सज्ज असल्याचे आमदार क्षीरसागर यांनी सांगितले. 

यावेळी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजित जाधव, उपजिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे, उपजिल्हाप्रमुख रमेश खाडे, उपजिल्हाप्रमुख उदय भोसले, उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, उपजिल्हाप्रमुख दिपक चव्हाण,महानगरप्रमुख कमलाकर जगदाळे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख शुभांगी पोवार, शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर, शहरप्रमुख अमरजा पाटील, महानगर समन्व्यक पूजा भोर युवासेना जिल्हासंपर्क प्रमुख प्रसाद चव्हाण, शहरप्रमुख पियुष चव्हाण, योगेश चौगुले, निलेश गायकवाड, कपिल सरनाईक, शैलेश साळोखे, रुपेश इंगवले, शुभम शिंदे,यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

Tags: