yuva MAharashtra काही तरी काम द्या..!

काही तरी काम द्या..!

सांगली टाईम्स
By -


- माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे

- प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना साकडे

सांगली / प्रतिनिधी

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणानंतर मंत्रिपद गमाविलेल्या आमदार धनंजय मुंडे यांनी आता पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. रायगडमधील एका कार्यक्रमात त्यांनी तटकरे यांना काहीतरी महत्वाची जबाबदारी द्या, अशी मागणी केली आहे. त्यामुळे मुंडे यांना पक्षात मोठी संघटनात्मक जबाबदारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राजकारणात मी तटकरे यांच्यामुळेच खबीरपणे उभा असल्याचे सांगत मुंडे म्हणाले, तटकरे यांनी आम्हाला कायम मार्गदर्शन करत रहावे. आमच काही चुकलं तर कान धरावा. पण आता रिकाम ठेवू नये. काहीतरी जबाबदारी द्यावी. काम करण्याची संधी द्यावी. दरम्यान मुंडे यांच्या या विधानानंतर तटकरे यांनी यासंदर्भात पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील असे सांगितले आहे. 

Tags: