yuva MAharashtra आमदार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सजावट स्पर्धेत 'सावकार' प्रथम

आमदार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सजावट स्पर्धेत 'सावकार' प्रथम

सांगली टाईम्स
By -

- लवकरच बक्षीस वितरण सोहळा

सांगली / प्रतिनिधी

सांगली विधानसभा मतदार संघातील भाजपचे कार्यसम्राट आमदार सुधीर गाडगीळ यांच्या संकल्पनेतून नुकतीच “आमदार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सजावट स्पर्धा” संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये सांगली विधानसभा क्षेत्रातील १८ ते २० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभाग नोंदवून उत्साहात सजावटी सादर केल्या. स्पर्धेचे प्रमुख विषय ‘ऑपरेशन सिंदूर’ व ‘स्वदेशी’ असे होते.

या स्पर्धेत सावकार गणेशोत्सव मंडळ, सांगली — प्रथम क्रमांक (रुपये १५०००), ओंकार क्रीडा विकास मंडळ, बुधगाव — द्वितीय क्रमांक (रुपये १००००) तर सांगली फ्रेंड सर्कल, सांगली — तृतीय क्रमांक (रुपये ५०००) यांनी बाजी मारली. या स्पर्धेसाठी श्री. मुकुंद पटवर्धन, श्री. विश्वजीत पाटील, श्री. अतुल माने व श्री. केदार खाडीलकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी सर्व विजेत्या मंडळांचे अभिनंदन करत सांगितले की, लवकरच या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा भव्यदिव्य पद्धतीने पार पडणार आहे.

Tags: