- साडेतीन हजारांवर स्पर्धकांचा समावेश
- प्रथम पारितोषिक ५१ हजारांचे
सांगली / प्रतिनिधी
सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली मिरज कुपवाड मनपा क्षेत्रात आयोजित घरगुती गणपती सजावट स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रम उद्या गुरुवार २५ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता खरे मंगल कार्यालय विश्रामबाग सांगली येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.
या उपक्रमात मनपा क्षेत्रातील साडेतीन हजार पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग दर्शविला होता. प्रथम पारितोषिक ५१ हजार रुपयाचे सोन्याचे नाणे द्वितीय पारितोषिक ३१ हजार रुपये सोन्याचे नाणे व तृतीय पारितोषिक २१हजार रुपये सोन्याचे नाणे व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त १०० विशेष उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात येणार आहेत. याशिवाय स्पर्धेत सहभागी प्रत्येक स्पर्धकाला विशेष भेट वस्तू व डिजिटल प्रमाण पत्र देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे.
सजावट स्पर्धा आयोजन पालकमंत्री कार्यालय (GMO) द्वारे करण्यात आले होते. या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश भाऊ खाडे, सुधीर दादा गाडगीळ, भाजप जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, तसेच भाजप कोअर कमिटी सदस्य, जिल्हा कार्यकारणी सदस्य, मंडल कार्यकारिणी सदस्य, इतर सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
