yuva MAharashtra भाजपची इशारा सभा आता होणार ऑनलाइन

भाजपची इशारा सभा आता होणार ऑनलाइन

सांगली टाईम्स
By -

  


- पुरपरिस्थितीमुळे निर्णय 
- १ ऑक्टोबरला राजमती हॉल मध्ये आयोजन
-  मर्यादित कार्यकर्ते उपस्थित राहणार

सांगली / प्रतिनिधी

विकृतीच्या रावणाचे दहन करण्यासाठी आणि संयमाला सभ्यतेने उजळविण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्यावतीने  बुधवारी एक ऑक्टोंबर रोजी सायंकाळी साडे चार वाजता घेण्यात येणारी इशारा सभा आता ऑनलाइन पध्दतीने घेण्यात येणार आहे. पावसाचा जोर आणि राज्यातील पूरपरिस्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या ऑनलाइन सभेची लिंक  सर्वासाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने संपूर्ण राज्यातील जनता ही सभा ऐकतील. या सांगलीतील नेमिनाथनगरमधील राजमती हॉलमध्ये होणाऱ्या सभेसाठी मर्यादित प्रमुख मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत अशी माहिती भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राटबाबा  महाडीक  यांनी  दिली.

प्रकाश ढंग व सम्राटबाबा महाडीक म्हणाले की, महाराष्ट्राची राजकीय संस्कृती कुणी नासवली, कोणी स्वार्थासाठी जातीय मांडणी केली. कोण इतारांच्या आया-बहिणी काढल्या आणि कोणाच्या जीभेने विषाची पेरणी केली याचे पितळ राज्यातील जनतेसमोर उघडे पाडण्यासाठी ही इशारा सभा घेण्यात येणार आहे. सज्जनतेचा आव आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधी पक्षांचा बुरखा या सभेमध्ये फाडण्यात येणार आहे. परंतू राज्यावर पडलेल्या आस्मानी संकटामुळे ओढवलेली पुरपरिस्थिती आणि पावसाचा वाढलेला जोर पाहून ही सभा सांगलीतील नेमिनाथनगरमधील राजमती हॉलमध्ये प्रमुख मर्यादित मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आता ऑनलाइन पध्दतीने घेण्यात येणार आहे. 

Advt.

तसेच ऑनलाइन सभा घेतल्याने वाचलेल्या मोठ्या सभेच्या खर्चाची रक्कम सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त बांधवांना दिली जाणार आहे. तसेच या सभेनंतर त्याचठिकाणी विकृतीच्या रावणाचे दहन करण्यात येणार आहे. या मर्यादित मान्यवर आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या ऑनलाइन सभेची राज्यभरातील कार्यकर्त्यासाठी ऑनलाइन लिंक उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यातील जनता ही सभा ऑनलाइन पध्दतीने ऐकतील. राज्यातील सर्व सूज्ञ जनता विकृतीच्या रावणाचे दहन केलेले  पाहतील. अशी माहिती शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग व ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राटबाबा महाडीक यांनी दिली.

Tags: