yuva MAharashtra ‘सांगली अप्पर’च्या कार्यक्षेत्रातील १७१ पाणंद रस्ते खुले होणार

‘सांगली अप्पर’च्या कार्यक्षेत्रातील १७१ पाणंद रस्ते खुले होणार

सांगली टाईम्स
By -

 


- अप्पर तहसिलदार अश्विनी वरुटे

- कवठेपिरानमधील मातंग दपनभूमीकडे जाणारा रस्ताही झाला खुला

सांगली । प्रतिनिधी
देशाचे पंतपधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे निमीत्त साधत सांगली अप्पर तहसिल कार्यालयाच्या वतीने सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुशंगाने कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील २९ गावांमध्ये शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये प्रत्येक गावातील जवळपास १७१ वहीवाटीचे पाणंद, शेत रस्त्याची पडताळणी करण्यात आली. हे रस्ते लवकरच खुले होणार आहेत. रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत. दरम्यान कवठेपिरान (ता. मिरज) येथील मातंग दपनभूमीकडे जाणारा रस्ताही ५० वर्षानंतर पहिल्यांदाच खुला करण्यात आला.

दरम्यान शिवार फेरीमध्ये नकाशावर असले व नसलेले तसेच वहीवाटीत असलेले व अतिक्रमणामुळे वहिवाटीस अडथळा असलेल्या रस्तांची पहाणी करुन माहिती संकलीत करण्यात आलेली आहे. या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये एकुण इतक्या १७१ पाणद/शिवार रस्ताची पहाणी करुन सेवा पंधरवडयामधील निर्देशनुसार रस्ते नकाशावर घेणे, रस्ताच्या लांबी व रुदी बाबत मोजणी विभागाकडून सिमांकन करुन घेणे, त्यांच्या नोंदी ७/१२ पत्रकी घेणे त्याच प्रमाणे अतिक्रमीत रस्त्यावरील अतिक्रमणे हटवणे याबाबत नियोजन करण्यात आलेले आहे असे अप्पर तहसिलदार अश्विनी वरुटे यांनी सांगितले.

५० वर्षांनंतर दफनभूमीकडे जाणारा रस्ता झाला मोकळा

कवठेपिरान मंडळातील मातंग समाजाच्या दफनभूमी कडे जाणारा रस्ता आज वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. सदरची दफन भूमी ५० वर्षापूर्वीपासूनची असून या दफन भूमी कडे जाण्यासाठी केवळ एक पाऊलवाट होती. त्यामुळे मयत व्यक्तीचे पार्थिव घेऊन जाण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होत होत्या. परिसरातील शेतकर्‍यांच्या संमतीने आठ फूट रस्ता सर बांधावरून तयार करण्यात आला आणि दफनभूमीकडे जाणार्‍या रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यात आला. यावेळी मातंग समाजाने आणि इतर सर्व उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले. याव्यतिरिक कार्यक्षेत्रातील सर्वच गावांमध्ये पाणंद रस्ताचे अतिक्रमण मुक्त करणे सरबांधारून रस्ते तयार करणे याची मोहीम त्याच पद्धतीने वहिवाटीच्या रस्तेचे सीमांकन करण्याची मोहीम सुरु आहे सर्व शेतकर्‍यांनी सेवा पंधरवड्याचा जास्ती जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन अप्पर तहसिलदार वरुटे यांनी केले आहे.

दरम्यान १७ रोजी सर्व गांवामध्ये ग्रामसभेमध्ये सर्व ग्रामपंचायतीच्या ठिकाणी ग्रामसेभेचे आयोजन करण्यात आलेले होते या ग्रामसभेमध्ये सेवा पंधरवडा मध्ये राबवण्यात येणा-या उपक्रमाची माहिती देण्यात आली तसेच सदर ग्रामसभामध्ये शिवार फेरीमध्ये पाणद, शिवार रस्ताची उपलब्ध झालेली माहिती देण्यात आली व या शिवाय काही पांणद, रस्ते राहिले असल्यास ते निदर्शनास आणून देण्याचे आवाहान करण्यात आले तसेच अतिक्रमण रस्ते सामोपचाराने अतिक्रमण मुक्त करुन वहिवाटीखाली आणण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत संबधीत ग्रामस्त् यांना विनंती करण्यात आली तसेच अंकली, तुंग, मौजे डिग्रज, नांद्रे दुधगांव या पाच गांवामध्ये सर्व पाणंद रस्ताचे सिमांकन करण्यात आले. तसेच उर्वरीत सर्व गांवामध्ये दिनांक १८ सप्टेंबर पासुन सिमांकन मोजणी विभागा मार्फत करण्यात येणार आहे. सेवा पंधरवडयामधील राबवण्यात येणारे उपक्रम, मोहिमासाठी ग्रामस्थानी सक्रारात्म प्रतिसाद देऊन सहकार्य करावे असे आवाहन तहसिलदार वरुटे यांनी केले आहे.



Tags: