yuva MAharashtra नांद्रे-पाचवा मैल रस्त्यावरील रेल्वे पूल अखेर वाहतूकीसाठी खुला

नांद्रे-पाचवा मैल रस्त्यावरील रेल्वे पूल अखेर वाहतूकीसाठी खुला

सांगली टाईम्स
By -
सांगली। प्रतिनिधी

नांद्रे ते पाचवा मैल रस्त्यावरील रेल्वेचा उड्डाण पूल अखेर वाहतूकीसाठी खुला करण्यात आला आहे. याबाबत सर्व पक्षीय कृती समितीने आंदोलनाचा इशारा दिला होता. पूल खुला करण्यासाठी २० ऑगस्टची डेडलाईन दिली होती. या आंदोलनाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेत पूल वाहतूकीसाठी खूला करण्याचे आदेश दिल्याची माहिती समितीचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी दिली.
ते म्हणाले, नांद्रे ते पाचवा मैल रस्त्यावर वसगडे हद्दीत रेल्वेने उड्डाण पूल बांधला आहे. पूलाचे बांधकाम पूर्ण झाले असतानाही पूल वाहतूकीसाठी खुला करण्यात येत नव्हता. पावसाळा असल्याने पर्यायी मार्गावरुन ये-जा करण्यास नागरिकांसह वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. वाहतूक कोंडी होत होती. याशिवाय छोटे-मोठे अपघातांच्या घटनाही घडत होत्या.

नागरिकांचा त्रास लक्षात घेत पूल वाहतूकीसाठी खुला करावा अशी मागणी सर्व पक्षीय कृती समितीने केली होती. यााठी प्रशासनाला २० ऑगस्टची मुदत दिली होती. अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला होता. अखेर या मागणीची दखल मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली. त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेत जिल्हा प्रशासनाला पूल वाहतूकीसाठी खुला करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पूल वाहतूकीसाठी खुला करण्यात आला आहे, असे साखळकर यांनी सांगितले. यावेळी उमेश देशमुख, महेश खराडे, गजानन साळुंखे, प्रदीप कांबळे आदी उपस्थित होते.