◼️ सामाजिक कार्यकर्ते आयुब पटेल यांचा आरोप
सांगली / प्रतिनिधी
सांगली शहरातील राम मंदिर चौक येथे असलेल्या इमारतीवर एका कंपनीने बेकायदशीर बांधकाम सुरू केले आहे. याचा बांधकाम परवाना मागितला असता महापालिका नगररचना, बांधकाम विभाग प्रतिसाद देत नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते आयुब पटेल यांनी केला आहे. बांधकाम परवाना नसेल तर महापालिकेने तातडीने सुरू असलेले बांधकाम थांबवावे अशी मागणी पटेल यांनी केली आहे.
पटेल म्हणाले, सांगली शहरातील राम मंदिर चौक येथे बीओटी तत्त्वावर इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीच्या वर एका कंपनीने अधिकृतपणे बांधकाम करण्यास सुरूवात केली आहे. याबाबत महापालिका बांधकाम, नगररचना विभागाकडे तक्रार केली आहे. बांधकाम परवाना उपलब्ध करून देण्याची मागणी केली असता दोन्ही विभागाकडून प्रतिसाद मिळत नाही. माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. मनपाने तातडीने हे बांधकाम थांबवावे, अशी मागणी पटेल यांनी केली आहे.
