◼️ सांगलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जनआक्रोश आंदोलन
◼️ राज्य शासनाचाही पत्ते खेळत निषेध
सांगली / प्रतिनिधी
भ्रष्ट आणि कलंकित मंत्र्यांना राज्य सरकार पाठीशी घालत आहे. अशा मंत्र्यांना घरी पाठवा. त्यानं मंत्रिपदावरून दूर करा यासह अन्य मागण्यासाठी सांगलीत हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे चौक येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. कलंकित मंत्र्याचे मुखवटे लावत, रस्त्यावर पत्ते खेळून राज्य शासनाचा निषेध करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शंभूराज काटकर, विशालसिंग राजपूत, अभिजित पाटील, संजय काटे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. विधानसभेत पत्ते खेळणारे माजी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, कॅन्टीन चालकाला मारहाण करणारे आमदार संजय गायकवाड, समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट, गृहराज्यमंत्री योगेश कदम, रोजगार हमी मंत्री भारतशेठ गोगावले आदी मंत्र्याचा यावेळी तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. अशा मंत्र्यांना राज्य सरकार पाठीशी घालते ही लोकशाहीची थट्टा आहे. सभागृहाचा तसेच समस्त महाराष्ट्राचा अपमान असल्याचे सांगत आंदोलक शिवसैनिकांनी सरकार विरोधात घोषणा देत अवघा परिसर दणाणून सोडला. आंदोलक शिवसैनिकांनी यावेळी काही मंत्र्यांचे मुखवटे परिधान केले होते. काहींनी रस्त्यावरच पत्त्याचा डाव मांडला.
महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका योजना पाटील, सुजाताई इंगळे, मनीषा पाटोळे, रूपाली सावंत, शाकिरा जमादार, महादेव मगदूम, विष्णू पाटील, रुपेश मोकाशी, विराज बुटाले, संतोष पाटील, प्रसाद रिसवडे, राजेश कदम, सचिन शिवजी, रवी सूर्यवंशी, किशोर चाचणी, शुभम उपाध्ये, सागर बामणे, कुबेर राजपूत, महादेव हुलवान, अली नालबंद, रोहित भोसले, जहागीर शेख, गणेश लोखंडे, शितल थोरवे, किशोर सासणे, पुरन मलमे, प्रमोद सावंत, शहाजी बापु जाधव, प्रमोद दरेकर, शंभूराजे खरमाटे, आनंदा दबडे,उत्तम भोसले, सानप दादा, महिला आघाडीच्यां, मनिषा पाटोळे, रूपाली सावंत, सुगंधा माळी, दिलीप गिड्डेपाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख तानाजी सातपुते, ओंकार देशपांडे, बाळासाहेब हत्तेकर, विठ्ठल संकपाळ, पांडुरंग लोहर, विष्णू पाटील, विश्वास कांबळे, कुबेरसिंग राजपूत, रोहन कोळी, सनी कोरे, नंदू जाधव, प्रथमेश यमगर,भरतकुमार पाटील, अनिल हुल्ले, मुन्ना शेख यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

