◼️महेश कांबळे यांची खरमरीत टीका
◼️४० वर्षात अण्णाभाऊंचा पुतळा का उभा केला नाही?
सांगली / प्रतिनिधी
जयंत पाटील गेल्या ४० वर्षात सातत्याने सत्तेत होते. आमदार, मंत्री, पालकमंत्री पदे त्यांनी भोगली. पण त्यांना इस्लामपूरमध्ये अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभा करण्याची सुबुद्धी झाली नाही. आता मात्र मतांची बेरीज करण्यासाठी ते राजाराम बापू बँकेच्या माध्यमातून पुतळा उभा करू असे सांगत आहेत. त्यांचे राजकारण कुजक आहे. सरड्यासारखे रंग बदलणारे ते राजकारणी आहेत अशी खरमरीत टीका आंबेडकरवादी चळवळीचे कार्यकर्ते डॉ. महेश कांबळे यांनी पत्रकार बैठकीत बोलताना केली.
ते म्हणाले, जयंत पाटील विधानसभा निवडणुकीत केवळ ११ हजार मतांनी निवडून आले आहेत. वाळवा विधानसभा मतदार संघात २२ हजार मतदान हे मातंग समाजाचे आहे. यावर डोळा ठेवून जयंत पाटील यांनी अण्णा भाऊंचा पुतळा उभा करण्याची घोषणा केली आहे. पण त्यांनी समाजाची फसवणूक करू नये. त्यांची खरी इच्छा असेल तर त्यांनी निधी मंजुरीचे पत्र तातडीने नगरपालिकेला द्यावे. त्यांची केविलवाणी धडपड सुरू आहे. ते कट्टर जातीयवादी विचारसरणीचे आहेत. त्यांच्या डोक्यात शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार नाहीत.
कांबळे म्हणाले, जयंत पाटील गेल्या ४० वर्षात सातत्याने सत्तेत होते. आमदार, मंत्री, पालकमंत्री होते. त्यांना कधी इस्लामपूरमध्ये अण्णाभाऊंच्या पुतळा उभा करण्याची सुबुद्धी झाली नाही. आता मात्र त्यांना मातंग समाजाची आठवण झाली आहे. त्याचे कारण राजकारणच आहे. या विधानसभा निवडणुकीत त्यांना निसटता विजय मिळाला आहे. केवळ ११ हजार मतांनी ते विजयी झाले आहेत. त्यासाठीच त्यांची ही केविलवाणी धडपड सुरू असल्याचा आरोप कांबळे यांनी केला आहे.
