◼️संतोष कदम
◼️रायगड जिल्हा युवक कार्यकारिणी जाहीर
सांगली / प्रतिनिधी
संभाजीराजे छत्रपती यांचे विचार, स्वराज्य पक्षाची ध्येयधोरणे तळागाळात, घराघरात पोहचविण्यासाठी कटिबद्ध असून या साठी ' गाव तिथे स्वराज्य पक्षाची शाखा, घर तिथे स्वराज्य' ही संकल्पना राबविणार असल्याची माहिती पक्षाचे मुंबई विभाग युवक आघाडीचे अध्यक्ष संतोष कदम यांनी दिली. कदम यांनी रायगड जिल्हा युवक आघाडीची जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली. या प्रसंगी ते बोलत होते.
कदम म्हणाले, संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात व सरचिटणीस धनंजय जाधव, पक्षाचे उपाध्यक्ष अंकुश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्य पक्षाची महाराष्ट्रात घौडदौड सुरू आहे. स्वराज्यच्या बांधणीत युवकांचा मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे. शेतकरी, कष्टकरी, मजूर, विद्यार्थीसह समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी स्वराज्यची स्थापना करण्यात आली आहे. त्यांचे विचार घराघरात पोहचविण्यासाठी पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता कटिबद्ध आहे.
![]() |
| Advt. |
दरम्यान यावेळी कदम यांच्या उपस्थित रायगड जिल्हा युवक कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. ॲड. ओमकार विठ्ठल जाधव (जिल्हाध्यक्ष), अजित घाडगे (जिल्हाउपाध्यक्ष), अमित शिर्के (जिल्हा सचिव), दिनेश काळंगे (जिल्हा सहसचिव), मनोहर पाटील (जिल्हा संघटक), सचिन माने (जिल्हा उपसंघटक) व ऋषिकेश घुले (जिल्हा उपसंघटक) अशी नियुकी केलेल्या पदाधिकाऱ्यांची नावे आहेत.

