yuva MAharashtra ५० कोटी निधीतील दुबार कामांच्या तक्रारींबाबत होणार चौकशी

५० कोटी निधीतील दुबार कामांच्या तक्रारींबाबत होणार चौकशी

सांगली टाईम्स
By -

 


- आयुक्त सत्यम गांधी यांची माहिती

सांगली / प्रतिनिधी
महापालिका क्षेत्रात शासनाच्या ५० कोटी निधीतून विविध कामे सुरू आहेत. यातील काही दुबार कामे आहेत, अशी तक्रार झाली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी केली जाईल, अशी माहिती आयुक्त सत्यम गांधी यांनी दिली. दरम्यान महापालिका क्षेत्रातील व्यावसायिक इमारती, मॉल, रुग्णालयांच्या पार्किंगची १५ दिवसात तपासणी होईल. पार्किंग सुविधा नसलेल्या इमारतींमध्ये सक्तीने पार्किंग सुविधा निर्माण केली जाईल, असेही गांधी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

शहरातील अनेक रुग्णालयांच्या, व्यापारी, व्यावसायिक, खासगी इमारती, अन्य इमारतींना पार्किंग सुविधाच नाही. महापालिकेकडून या इमारतींच्या बांधकामासाठी परवाना घेताना नियमाप्रमाणे पुरेशी पार्किंग जागा दाखवली जाते. परंतु वास्तवात ही जागा वाहनतळ म्हणून न वापरता दुकाने, गाळे, गोदामे किंवा इतर कारणांसाठी वापरली जाते, भाड्यानेदिली जाते. पार्किंगचा असा बाजार अनेक ठिकाणी दिसून येतो. 

सांगलीत आनंद थिएटरमागे महापालिकेच्या पार्किंग जागेत तळमजला व त्यावर ९ मजले पार्किंग सुविधेचा आराखडा मंजूर केला आहे. पहिल्या टप्प्यात तळमजला व त्यावर एका मजल्याचे बांधकाम होणार आहे. प्रत्येक मजल्यावर ४० चारचाकी वाहने पार्क होतील, अशी क्षमता आहे. निधी उपलब्ध होईल, तसे टप्पा-टप्प्याने पार्किंग सुविधेचे मजले वाढत जातील, अशी माहिती आयुक्त सत्यम गांधी यांनी दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त अश्विनी पाटील, सहायक आयुक्त विनायक शिंदे उपस्थित होते.
Tags: