- रविवारी सांगलीत वितरण
- आमदार महेश लांडगे, जेष्ठ नेते अण्णासाहेब डांगेची उपस्थिती
सांगली । प्रतिनिधी
येथील ल. वि. तथा बाळासाहेब गलगले फौंडेशनच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनिय सेवा देणार्या व्यक्तींना देण्यात येणारा स्मृती सेवा पुरस्कार यंदा जत विधानसभा मतदार संघाचे भाजपाचे आमदार गोपीचंड पडळकर यांच्यासह सात जणांना देण्यात येणार आहे. रविवार २४ ऑगस्ट रोजी दैवज्ञ भवन सायंकाळी ५ वाजता पिंपरी चिंचवडचे आमदार महेश लांडगे, भाजपाचे जेष्ठ नेते तथा माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती फौंडेशनचे अध्यक्ष सुहास कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
ते म्हणाले, पुरस्काराचे यंदाचे हे १७ वे वर्ष आहे. हिंदूवरील अन्यायाविरोधात ठोस आणि आक्रमक भूमिका घेणार्या भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांना धर्मरक्षक, सामान्य कार्यकर्ता ते महापालिकेच्या स्थायी समितीपर्यंत मजल मारणारे माजी नगरसेवक पांडूरंग कोरे यांना नगरसेवा पुरस्कार, पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनिय काम करणारे सकाळचे सहयोगी संपादन शेखर जोशी यांना वृत्तपत्रसेवा, भेदिक शाहिरी क्षेत्रातील अविष्कार देशिंगे यांना शाहिरी सेवा, उदयराव यादव यांना सहकार सेवा, पर्यावरण क्षेत्रात काम करणार्या डॉ. मनोजकुमार पाटील यांना पर्यावरण सेवा, पॅरिस येथील पॅरा ऑलंपिंक स्पर्धेत रौप्य पदक विजेता सचिन खिलारी यांना क्रिडासेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
येत्या रविवार २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता मान्यवरांच्या हस्ते दैवज्ञ भवनमध्ये या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याचे सांगत कुलकर्णी म्हणाले, पिंपरी चिंचवडे आमदार महेश लांडगे हे प्रमख पाहुणे तरांच जेष्ठ नेते अण्णासाहेब डांगे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. याशिवाय आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सत्यजीत देशमुख, आमदार सदाभाऊ खोत आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी बाळासाहेब देशपांडे, अरुण गडचे, रविंद्र वादवणे, श्रीकांत शिंदे, संकेत कुलकर्णी, अतुल कुलकर्णी, विजयदादा कडणे, सुहास कलघटगी, विनायक भोसले, भालचंद बक्षी आदी उपस्थित होते.

